Soybean Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Crop Update : सोयाबीन दाणे भरण्याच्या, भुईमूग फुलोऱ्याच्या अवस्थेत

Summer Season : लातूर विभागातील पाचही जिल्ह्यांत उन्हाळी हंगामातील सोयाबीन दाणे भरण्याच्या, भुईमूग फुलोरा व अऱ्या सुटण्याच्या अवस्थेत, तर उन्हाळी मक्याचे पीक कणसे सुटण्याच्या अवस्थेत आहे.

Team Agrowon

Latur News : लातूर विभागातील पाचही जिल्ह्यांत उन्हाळी हंगामातील सोयाबीन दाणे भरण्याच्या, भुईमूग फुलोरा व अऱ्या सुटण्याच्या अवस्थेत, तर उन्हाळी मक्याचे पीक कणसे सुटण्याच्या अवस्थेत आहे.

लातूर कृषी विभागातील लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड या पाचही जिल्ह्यांत सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ८३ टक्के पेरणी झालेल्या उन्हाळी हंगामातील पिकांसाठी काही औषध असले, तरी काहींना फटका देण्याचे काम अवकाळी पावसाने केले आहे.

लातूर विभागात मागील सप्ताहात हवामान उष्ण व कोरडे होते. विभागातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ८१३.३८ मिलिमीटर असून, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ९३५.९८ मिलिमीटर इतका पाऊस झाला.

तो ३१ ऑक्टोबरच्या सरासरीच्या तुलनेत ११५ टक्के, तर वार्षिक सरासरीच्या ११५ टक्के होता. विभागातील पाचही जिल्ह्यांत खरिपात १०० टक्के, तर रब्बीत १०० टक्क्यांचा पुढे जाऊन पेरणी झाली होती.

खरीप आणि रब्बीत नैसर्गिक आपत्तीने पिकांचे मोठे नुकसान झाले आता उन्हाळी पिकांनाही अवकाळीचा फटका बसतो आहे. विभागातील उन्हाळी हंगामाचे सरासरी क्षेत्र ७१ हजार हेक्टर असून, ५९ हजार हेक्टर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या ८३ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.

उन्हाळी पीक स्थिती

उन्हाळी सोयाबीन : पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १६ हजार १५६ हेक्टर असून, आतापर्यंत १२ हजार ७०५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. त्याची टक्केवारी ७९ टक्के आहे. पीक सध्या दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे.

उन्हाळी भुईमूग : पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र २६ हजार ३८८ हेक्टर असून, आतापर्यंत २२ हजार ३८१हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. त्याची टक्केवारी ८५ टक्के आहे. पीक सध्या फुलोरा व अऱ्या सुटण्याच्या अवस्थेत आहे.

उन्हाळी मका : पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ८ हजार ०५७ हेक्टर असून, आतापर्यंत ६ हजार ४६२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. त्याची टक्केवारी ८० टक्के आहे. पीक कणसे सुटण्याच्या अवस्थेत आहे.

जिल्हानिहाय सर्वसाधारण प्रत्यक्ष पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टरमध्ये)

जिल्हा - सर्वसाधारण क्षेत्र- प्रत्यक्ष पेरणी

लातूर - २३९६ - ३११२

धाराशिव - ९५५५- ५६४१

नांदेड - २२४४१- ३०३५३

परभणी- १०९५९- ८७०४

हिंगोली - २६३४९ - ११४५४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT