Soybean Market Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Market : साताऱ्यातील कोरेगावात सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरु

Soybean Rate : नोंदणीचे आवाहन; नाफेड देणार ४८९२ रुपये दर

Team Agrowon

Satara News : कोरेगाव, जि. सातारा : तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती व कोरेगाव तालुका खरेदी-विक्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय कृषी सहकारी संघ तथा ‘नाफेड’च्या माध्यमातून बाजार समितीच्या आवारात खरेदी-विक्री संघाच्या गोदामामध्ये हमीभाव अर्थात आधारभूत किंमत प्रतिक्विंटल चार हजार ८९२ रुपये दराने सोयाबीन खरेदी केंद्र आज सुरू करण्यात आले. सोयाबीन हमीभाव तथा आधारभूत केंद्रावर ज्या शेतकऱ्यांना आपले सोयाबीन विक्री करायचे आहे, अशा शेतकऱ्यांनी पीक पाणीत सोयाबीनची पेरणी नोंद असलेला सातबारा उतारा, खाते उतारा, आधार कार्ड, बँकेचे पासबुक, मोबाईल क्रमांक ही कागदपत्रे सोबत घेऊन केंद्रावर आपली नोंदणी करावी. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना खरेदी केंद्राद्वारे मोबाईल मेसेजच्या माध्यमातून खरेदी कोणत्या दिवशी होणार आहे, हे कळविले जाईल.

त्यादिवशी शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन खरेदी केंद्रावर घेऊन यायचे आहे. तत्पूर्वी शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन स्वच्छ, काडीकचरा, मातीमुक्त करून वाळवून तयार ठेवावे. माती व काडीकचरा नसलेले आणि ओलावा दहा टक्केपेक्षा कमी असलेले सोयाबीन खरेदी केले जाणार आहे.

कोरेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष शहाजी क्षीरसागर, कोरेगाव बाजार समितीचे सभापती ॲड. पांडुरंग भोसले, उपसभापती दिलीप अहिरेकर, संचालकांचे प्रयत्न व पाठपुराव्यातून कोरेगावच्या सहायक निबंधक प्रीती काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे खरेदी केंद्र येत्या सोमवारपासून (ता. २८) प्रत्यक्षात सुरू करण्याचा मनोदय असल्याचे पत्रक खरेदी-विक्री संघाचे व्यवस्थापक राजेंद्र येवले व बाजार समितीने सचिव संताजी यादव यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

कोल्हापूर विभागात अव्वल...

दरम्यान, हमीभाव खरेदी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतमालाला न्याय आणि उच्च वाजवी दर देण्यासाठी कोरेगाव बाजार समिती आणि कोरेगाव खरेदी-विक्री संघ कायमच प्रयत्नशील आहे. सन २०१७ -१८ मध्ये कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून खरीप हंगामात साडेसात हजार क्विंटल सोयाबीन व रब्बी हंगामात तीन हजार ३०० क्विंटल हरभरा खरेदी केला होता. त्यावेळेस बाजार समितीने कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांकाचे काम केलेले होते. तद्वत याहीवर्षी काम करण्याचा मानस कोरेगाव बाजार समितीने ठेवलेला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

Farm Equipment: मुरुडमध्ये अल्पभूधारकांना कृषी अवजारांचे वाटप

Ahilyanagar Agro Tourism : अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कृषी पर्यटनाची निर्मिती करा

Research Paper Award: श्रीशैल्य हेगान्ना यांना रिसर्च अवॉर्ड

SCROLL FOR NEXT