Agriculture Subsidy Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Subsidy : सोयाबीन, कापूस उत्पादकांना मिळणार हेक्टरी पाच हजार रुपये

Agriculture Update : खरीप हंगाम २०२३ मधील नुकसानग्रस्त कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रतिहेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसाह्य मिळणार आहे.

Team Agrowon

Solapur News : खरीप हंगाम २०२३ मधील नुकसानग्रस्त कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रतिहेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसाह्य मिळणार आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात १ हजार ९९ कापूस उत्पादक आणि १ लाख ७० हजार १८३ सोयाबीन उत्पादक याप्रमाणे १ लाख ७१ हजार २८२ शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे.

राज्याच्या कृषी विभागाकडून त्यासाठी शेतकऱ्यांकडून कागदपत्रे जमा करण्यात येत आहेत. संबंधित पात्र शेतकऱ्यांच्या नावांची यादी जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे आली आहे.

आता ती तालुकास्तरावर देण्यात आली असून, कृषीसहायकांमार्फत शेतकऱ्यांशी संपर्क साधून शेतकऱ्यांकडून कागदपत्रे घेण्यात येत आहेत. मुख्यतः मागच्या वर्षीच्या खरिपात ई-पीकपाहणी अॅपद्वारे पिकांची नोंद केलेल्या आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाच मिळणार आहे.

वैयक्तिक शेतकऱ्यांना संमतीपत्र आणि सामायिक खातेदार असतील, त्यांच्याकडून संमतीपत्रासह ना हरकत पत्र, सात-बारा उतारा, आधार कार्ड, बॅँक पासबुक ही कागदपत्रे घेतली जात आहेत.

पीकनिहाय लाभार्थी याप्रमाणे ...

उत्तर सोलापूर १७ हजार ७६२ (सोयाबीन), २ (कापूस),

दक्षिण सोोलपूर ९ हजार ८२४ (सोयाबीन), ४९ (कापूस)

अक्कलकोट २५ हजार ८६५ (सोयाबीन), ५९८ (कापूस)

मोहोळ ११ हजार २५ (सोयाबीन), ८ (कापूस)

माढा ४१६ (सोयाबीन), १६ (कापूस)

करमाळा १८८ (सोयाबीन), ११९ (कापूस)

बार्शी १ लाख ४ हजार ७४२ (सोयाबीन), १३ (कापूस)

पंढरपूर ११३ (सोयाबीन), १५ (कापूस)

सांगोला २९ (सोयाबीन), २१३ (कापूस)

मंगळवेढा ५४ (सोयाबीन), ५० (कापूस)

माळशिरस १६६ (सोयाबीन), १६ (कापूस)

एकूण १ लाख ७० हजार १५३ (सोयाबीन), १०९९ (कापूस)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT