Cotton and Soybean Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Crisis: शेतीमालाचे दर दबावात! कापूस-सोयाबीन उत्पादक संकटात

Cotton Soybean Market Fluctuation: राज्यात कापूस आणि सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली असून शेतकरी अडचणीत सापडले आहेत. हमीभाव केंद्रे बंद झाल्याने दर आणखी खाली गेले आहेत. सध्या सोयाबीनला ३६०० ते ४१५० रुपये प्रतिक्विंटल तर कापसाला हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे, यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Yavatmal News: कापूस व सोयाबीन हे शेतकऱ्यांच्या हक्काचे नगदी पीक मानले जाते. हमखास पैसे देणारे पीक म्हणून सोयाबीन तसेच कापसाची लागवड शेतकरी करतात. यंदा दोन्ही पिकांचे दर घसरले आहेत. सध्या सोयाबीनला ३६०० ते ४१५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. या दराने दोन्ही पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना हवालदिल केले आहे.

गेल्या वर्षी सोयाबीन हंगाम संपताना सोयाबीनने भाववाढ नोंदवली होती. या भाववाढीचा सर्वाधिक फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांना झाला. चांगले दर राहतील, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस तसेच सोयाबीनची लागवड केली. मात्र, सुरवातीपासूनच सोयाबीनच्या दरात मोठी घट झाली आहे.

खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. अनेक भागांत अतिवृष्टीने फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेतील हे पीक उद्ध्वस्त केले. सोयाबीनच्या दरात यंदाही मोठी घसरण झाली आहे. सोयाबीनचे दर हमीभावापेक्षाही खाली गेले आहेत. कापसाला कमी दराचा फटका बसला आहे.

कापसाचे दर हमीभावाच्या खाली गेले आहेत. त्यामुळे अजूनही शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी बाजारात काढलेला नाही. सोयाबीन तसेच कापूस ही शेतकऱ्यांची दोन्ही प्रमुख पिके आहेत. दोन्ही पिकांचे दर घसरल्याने शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरल्याचे दिसून येत आहे. सध्या शेतीमालाचे दर कोसळल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

सोयाबीनला तीन ३६०० ते ४१५० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. कापसाची स्थितीही तशीच असून दरात घसरण होत आहे. त्यातही सोयाबीनचे शासकीय केंद्र बंद झाले असून कापसाचीही स्थितीही तशीच आहे. दरात सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे शेतकरी विवंचनेत सापडला आहे.

दोन्ही पिकांचे दर हमीभावाच्या खाली

शेतकऱ्यांचे प्रमुख पीक असलेल्या कापूस तसेच सोयाबीनचे दर अक्षरश: कोसळले आहे. दोन्ही पिकांचे दर हमीभावापेक्षाही खाली गेले आहेत. यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. दरातील तफावत मोठी असल्याने काय करावे, असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT