Soybean Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Sowing : उन्हाळी सोयाबीनचा ७ हजार २२४ हेक्टरवर पेरा

सोयाबीनची ७ हजार २२४ हेक्टर आणि भुईमुगाची ५ हजार ४६८ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

Team Agrowon

Pabhani News : यंदाच्या उन्हाळी हंगामात शुक्रवार (ता. १०) पर्यंत परभणी जिल्ह्यात ६ हजार ५११ हेक्टर (५९.४२ टक्के) आणि हिंगोली जिल्ह्यात ८ हजार ७५० हेक्टर अशी दोन जिल्ह्यांत मिळून १५ हजार २६१ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

यंदा या दोन जिल्ह्यांत सोयाबीनची ७ हजार २२४ हेक्टर आणि भुईमुगाची ५ हजार ४६८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सोयाबीन, भुईमूग या पिकांना अधिक पसंती आहे. त्यानंतर बाजरी, ज्वारी, सूर्यफूल, मुग, उडीद पिकांकडे शेतकऱ्यांचा कल आहे.

परभणी जिल्ह्यात उन्हाळी हंगामातील सरासरी १० हजार ९५८ हेक्टरपैकी ६ हजार ५११ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गळीत धान्यांची ९ हजार ४८२ पैकी ५ हजार १५९ हेक्टरवर (५४.४१ टक्के) पेरणी झाली.

त्यात भुईमुगाची ६ हजार ७९६ पैकी १ हजार ७१८ हेक्टर, सोयाबीनचे सरासरी क्षेत्र २ हजार ६६२ असताना यंदा ३ हजार ४३२ हेक्टरवर, तीळाची ११.२४ पैकी ८ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

कडधान्यांचे सरासरी क्षेत्र ४९.०७ हेक्टर असताना ५७.९ हेक्टरवर पेरणी झाली. त्यात मूग १०.४ हेक्टर, उडदाची ३७ हेक्टरवर पेरणी झाली. तृणधान्यांची १ हजार ४२७ पैकी १ हजार २९४ हेक्टरवर पेरणी झाली. त्यात मका ५०९ हेक्टर, ज्वारी ७७ हेक्टर, बाजरी ७०७ हेक्टरचा समावेश आहे.

हिंगोली जिल्ह्यात सरासरी २६ हजार ३४८ पैकी ८ हजार ७५० हेक्टरवर पेरणी झाली. गळीत धान्यांची १४ हजार ८५६ पैकी ८ हजार १३३ हेक्टरवर पेरणी झाली.

त्यात भुईमुगाची ६ हजार ४६३ पैकी ३ हजार ७५० हेक्टर (५८.०१ टक्के), सोयाबीनची ८ हजार ३९२ पैकी ३ हजार ७९२ हेक्टर (४५.१८ टक्के), सूर्यफुलाची ४६५ हेक्टर, तिळाची १२६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. कडधान्यांची ५ हजार ५३० पैकी २४९ हेक्टरवर (४.५ टक्के) पेरणी झाली.

त्यात मूग १९४ हेक्टर, उडीद ५५ हेक्टरवर पेरणी आहे. तृणधान्यांची ५ हजार ९६२ पैकी ३६८ हेक्टरवर पेरणी झाली. त्यात मका १५२ हेक्टर, ज्वारी २१६ हेक्टर या पिकांचा समावेश आहे.

तालुकानिहाय पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये) (ता.१० मार्चपर्यंत)

तालुका - सरासरी क्षेत्र- पेरणी क्षेत्र- टक्केवारी

परभणी ३१०० ९६९ ३१.२८

जिंतूर ३९७५ २१२५ ५३.४५

सेलू २८० ३५३ १२६.०५

मानवत ५५८ ८७४ १५६.५३

पाथरी ४२२ ३८१ ९०.१४

सोनपेठ ४५९ ५६२ १२२.३९

गंगाखेड ५८५ १००३ १७१.२

पालम ३१२ ५२ १६.६३

पूर्णा १२६३ १९० १५.०४

वसमत १३२६४ ३९२१ २९.५६

औढानागनाथ २१२० १४०० ६६.०४

सेनगाव ६१९६ ३४२९ ५५.३३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT