Summer Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Crop : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र १४,९०३ हेक्टर होते. प्रत्यक्षात १३ हजार ३२३ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar News : दुष्काळाच्या छायेतही छत्रपती संभाजीनगर जालना व बीड या तीन जिल्ह्यांत यंदा उन्हाळी हंगामात सर्वसाधारण ३२,६५८ एकर क्षेत्राच्या तुलनेत २४ हजार ५६१ क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे.

पेरणी झालेल्या क्षेत्रामध्ये उन्हाळी मका, बाजरी, भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन आदी पिके पेरणीला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र १४,९०३ हेक्टर होते. प्रत्यक्षात १३ हजार ३२३ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली. यामध्ये उन्हाळी मकाच्या सर्वसाधारण ५८०२ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ५६८१ हेक्टर क्षेत्रावर मकाची पेरणी झाली.

मकाचे पीक सध्या दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. उन्हाळी बाजरीचे सर्वसाधारण क्षेत्र ४९२९ हेक्टर असताना प्रत्यक्षात ६५७६ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी बाजरीची पेरणी झाली. बाजरीचे पीक सध्या दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे.

जिल्ह्याचे उन्हाळी भुईमुगाचे सर्वसाधारण क्षेत्र ११७५ हेक्टर असताना प्रत्यक्ष ३८७ हेक्टरवर भुईमुगाची, तर सूर्यकुलाचे सरासरी ३८२ हेक्टर क्षेत्र असताना प्रत्यक्षात २४५ क्षेत्रावर व सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र १९७ हेक्टर असताना प्रत्यक्ष २५ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. जिल्ह्यात इतर उन्हाळी पिकांची जवळपास ४०८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

जालना जिल्ह्यात सरासरी १० हजार २९८ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ३५८५ क्षेत्रावर पेरणी झाली ही पेरणी करताना शेतकऱ्यांना उन्हाळी मकाचे सर्वसाधारण क्षेत्र ४३०४ हेक्टर असताना प्रत्यक्षात ११८२ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी मकाची पेरणी केली. मकाचे पीक सध्या शाखीय वाढीच्या व पोटऱ्याच्या अवस्थेत आहे उन्हाळी बाजरीची १४०३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली.

बाजरीचे पीक कणसात दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. उन्हाळी भुईमुगाचे जिल्ह्याचे सर्वसाधारण क्षेत्र १०६७४ हेक्टर असताना प्रत्यक्ष ४९९ हेक्टर क्षेत्रावर भुईमुगाची पेरणी झाली. भुईमुगाचे पीक सध्या फुटवे फुटण्याच्या ती शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे.

सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र ६९६ हेक्टर असताना प्रत्यक्षात. २४६ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली सोयाबीनचे पीक वाढीच्या व फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे. प्रत्यक्षात केवळ १७ हेक्टरवर उन्हाळी सूर्यफुलाची पेरणी झाली, इतर पिकांची जवळपास २३७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

बीड जिल्ह्यात यंदाचा उन्हाळी हंगामाचे सरासरी क्षेत्र ७४५५ हेक्टर असताना प्रत्यक्षात ७५२ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जाऊन उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. उन्हाळी मकाचे सर्वसाधारण क्षेत्र १००२६७ हेक्टर असताना प्रत्यक्षात ७८४ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी मकाची पेरणी झाली आहे. उन्हाळी बाजरीचे सर्व साधारण क्षेत्र तीन हजार तीन हेक्टर असताना प्रत्यक्ष त्याची पेरणी झाली. मकाचे पीक काढण्याच्या अवस्थेत असून काही ठिकाणी काढणी सुरू झाली आहे.

बीडमध्ये भुईमूग क्षेत्रात घट

उन्हाळी भुईमुगाचे जिल्ह्यातील सर्वसाधारण क्षेत्र २११७ हेक्टर असताना प्रत्यक्षात ७१८ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी भुईमुगाची पेरणी झाली. भुईमुगाची हे पीक शेंगा पुसण्याच्या तर काही ठिकाणी पक्वतेच्या अवस्थेत आहे. जिल्ह्यात जवळपास सात हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी सोयाबीनची पेरणी झाली आहे दीपिका फुले लागण्याच्या आरे सुटण्याच्या अवस्थेत असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

Sangli Vidhansabha Election : सांगलीत भाजपचं मायक्रो प्लॅनिंग; आर. आर. आबांच्या मुलाने वादळात दिवा लावला

Lumpy Skin Disease : दिघंचीमध्ये ‘लम्पी’चा विळखा

Agrowon Podcast : कांदा बाजारभाव दबावात; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत गहू दर?

SCROLL FOR NEXT