Rice Crop  Agrowon
ॲग्रो विशेष

Rice Sowing : आजऱ्यात भात पेरणी पन्नास टक्के पूर्ण

Kolhapur Sowing Update : आजरा तालुक्यात भात पेरणीचे काम पन्नास टक्के पूर्ण झाले आहे. भुईमूग टोकणी व सोयाबीन पेरणी अंतिम टप्यात आहे.

Team Agrowon

Kolhapur News : आजरा तालुक्यात भात पेरणीचे काम पन्नास टक्के पूर्ण झाले आहे. भुईमूग टोकणी व सोयाबीन पेरणी अंतिम टप्यात आहे. नागली पिकाच्या रोपवाटिका तयार करण्याचे काम सुरू आहे.

तालुक्यात मॉन्सूनचा पाऊस सक्रिय झाल्याने पेरणीच्या कामांना वेग आला आहे. तालुक्यात दररोज पावसाच्या हलक्या सरी कोसळत असून शेतकरी पेरणीच्या धांदलीत आहेत.

तालुक्यात ९ हजार ८०० हेक्टरवर भात पिकाचे क्षेत्र आहे. तालुक्यात उतूर परिसर व पूर्व भागात भात टोकणी व धूळवाफ केली जाते. त्यामुळे येथील भाताची पेरणी पूर्ण झाली आहे. पश्चिम भागात भाताची रोप लावण करण्याची पद्धत आहे.

त्यामुळे तालुक्यात ४ हजार हेक्टर रोपलावणीचे क्षेत्र आहे. भाताच्या रोपवाटिका शेतकऱ्यांनी तयार केल्या आहेत. नदीकाठावर व पाणी उपलब्ध आहे तेथे शेतकऱ्यांनी रोपलावण सुरू केली आहे.

पावसाचा जोर वाढल्यास रोपलावणीच्या कामाला वेग येणार आहे. तालुक्यातील एकूण भाताच्या क्षेत्रापैकी ४ हजार ३९० हेक्टरवर भाताची पेरणी झाली आहे. तालुक्यात भुईमुगाचे १८०० हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी ११०० हेक्टरपर्यंत भुईमुगाची टोकणी झाली आहे.

उतूर परिसर व पूर्व भागात टोकणीचे काम अंतिम टप्यात आहे. पश्चिम भागात भुईमुग टोकणीला सुरुवात झाली आहे.

सोयाबीनची पेरणी ५०० हेक्टरवर झाली आहे. नागलीचे क्षेत्र तालुक्यात ३५०० हेक्टरवर आहे. नागलीच्या रोपवाटिका तयार करण्याचे काम सुरू आहे. तालुक्यात अन्य पिके, भाजीपाला यांची लागवड आठवडाभरात सुरू होणार आहे.

यंदा जून महिना कोरडा गेला. पेरणीची कामे खोळंबली होती. जुलैमध्ये पावसाने सुरुवात केल्याने पेरणीला वेग आला आहे. जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT