Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात १ लाख हेक्टरवर खरिपाचा पेरा

Kharif Season : सोयबीन, भात ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. मात्र, गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यात जूनमध्ये समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणी केली असून गत आठवड्यापर्यंत १ लाख २ हजार ८७६ हेक्टरवर म्हणजे ४० टक्के पेरणी झाली आहे. सोयबीन, भात ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. मात्र, गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.

जिल्ह्यात १ ते २८ जून या काळात १६ दिवस पावसाने हजेरी लावली असून २१५ मिलिमीटर पाऊस झाला. सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत १६७ टक्के पाऊस झाला आहे. सर्वदूर पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची पेरणी सुरू केली.

खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २ लाख ५५ हजार ९८४ हेक्टर क्षेत्र असून १ लाख ०२ हजार ८७६ हेक्टरवर पेरा झाला आहे. जत तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली आहे. तर तासगाव तालुक्यात सर्वांत कमी म्हणजे ६९६ हेक्टरवर पेरा झाला आहे.

जिल्ह्यात बहुतांश भागात जोरदार पाऊस पडला असल्याने पेरणीसाठी अजूनही वाफसा आला नाही. त्यामुळे पूर्व मशागतीसह पेरणीची कामे खोळंबली आहेत. शिराळा तालुक्यात धूळ वाफ भात पेरणी आटोपली असून भात लागणीसाठी ८० हेक्टरवर शेतकऱ्यांनी रोपे तयार केली आहेत. सोयाबीन, भात, उदीड, मूग ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. जिल्ह्यात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे.

तालुकानिहाय खरीप हंगामातील पेरणी दृष्टिक्षेप

तालुका क्षेत्र (हेक्टरमध्ये)

मिरज १,९४९

जत ५३,२३५

खानापूर २,९११

वाळवा १३,६७६

तासगाव ६९६

शिराळा १४,६१८

आटपाडी ४,२२६

कवठेमहांकाळ ५,०८५

पलूस ७५०

कडेगाव ५,७२९

एकूण १,०२,८७६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nashik-Pune Highway : पुणे-नाशिक महामार्ग प्रकल्पात शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही

MNS Protest : शेतकरी आणि कर्मचाऱ्यांसह मनसेचा ‘पन्नगेश्‍वर’वर मोर्चा

Paddy Transplantation : पावसाअभावी सिंधुदुर्गात भातरोप पुनर्लागवड रखडली

Mulching Farming : शेतकऱ्यांची पॉली मल्चिंगला मागणी

Groundnut Sowing : खानदेशात भुईमूग लागवडीस गती

SCROLL FOR NEXT