Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : शेतात पाणी असल्याने पेरण्या लांबणीवर

Rabi Season : इगतपुरी तालुक्यासह त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे दोन्ही तालुक्यांतील भात शेतीला याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला होता.

Team Agrowon

Nashik News : इगतपुरी तालुक्यासह त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे दोन्ही तालुक्यांतील भात शेतीला याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. तसेच खरीप हंगामातील तयार झालेली पिके काढण्यास पावसामुळे अडथळा निर्माण झाला होता.

तसेच जास्त पावसामुळे भात शेतात अजूनही पाणी व ओलावा कायम राहिला असल्याने त्याचा परिणाम रब्बी हंगामाच्या पेरणीवर होताना दिसून येत आहे. खरीप हंगामातील पिकांची पेरण्यांनाही जुलैनंतर वेग आला होता. या हंगामात लागवड केलेला भात, वरई, उडीद, सोयाबीन व नागली यांसारखी पिके आता काढण्यात येत आहेत.

यातील काही पिकांची सोंगणी झाली असून, काही पिके अजूनही शेतात उभी आहेत. भाताच्या शेतात अजूनही पाणी साचले आहे. त्यामुळे सध्या पिके काढता येणे शक्य नाही. खरिपाची पिके अजूनही शेतात उभी असल्याने रब्बी पिकांच्या पेरण्या लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. या वर्षी सर्वत्र पावसाचे प्रमाण जास्त असले तरी रब्बीच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गव्हाची पेरणी थोडी उशिराने केली तरी चालणार आहे. या पिकांच्या पेरण्यांसाठी आधी शेत तयार करावे लागणार असून, त्यासाठी खरिपाची पिके काढणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र हीच पिके शेतात उभी असल्याने शेत तयार करणार कसे, असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

जोपर्यंत वाफसा तयार होत नाही, तोपर्यंत पेरणी करता येणार नाही. येत्या दहा दिवसांत चांगल्या प्रमाणात ऊन पडले तर वाफसा होणार आहे. ही परिस्थिती पाहता रब्बीसाठी शेतकऱ्यांना तूर्त तरी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

तालुक्यात सर्वत्र हीच स्थिती

त्रिंगलवाडी येथील शांताराम शेलार शेतकऱ्याच्या शेतातील भात पिकाची सोंगणी झाली असली तरी या पिकातील पाण्याचा आद्यपही निचरा झालेला नाही. त्यामुळे रब्बी हंगामाची तयारी कशी करावी असा प्रश्‍न सध्या भेडसावत आहे. आजही शेतात पाणी साचले आहे. शेतात पाणी साचून साचून शेतातील पाण्यावर शेवाळ साचले आहे. शेजारच्या शेतातील सर्व विहिरी उपळळ्याने शेतात वारंवार पाणी येत आहे.

अवकाळी पावसाने भात शेतीला चांगल्या प्रमाणात फटका बसला आहे. खरीप हंगामात खते, बी-बियाणे, मजुरी, औषध, वीजबिल, फवारणी यावर भरपूर खर्च झाला आहे. शेतातील पावसाचे पाणी अजून कमी झाले नाही. त्यामुळे महिनाभर तरी शेतात कोणतेही पीक घेता येणार नाही. आहे ती पीक ही गेले व पुढे दोन महिने शेत अंगावर पडले आहे.
-उमाजी रोंगटे शेतकरी, कवडदरा, ता. इगतपुरी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT