Sorghum Crop agrowon
ॲग्रो विशेष

Sorghum Crop : ज्वारीचे कोठार असलेल्या सोलापुरातच पीक घटलं, यंदा ज्वारीला भाव चांगला

Kharip Season : यंदा अल निनोमुळे राज्यातील अनेक भागात पाऊस न झाल्याने खरिप पिकांवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

sandeep Shirguppe

Sorghum Crop Decreased : यंदा अल निनोमुळे राज्यातील अनेक भागात पाऊस न झाल्याने खरिप पिकांवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. मागच्या ५ महिन्यात अत्यंत कमी पावसाने लाखो हेक्टर जमीनीवर पेरणी न झाल्याने अन्न धान्याचा तुटवडा आतापासूनच जाणवत आहे. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात ज्वारीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. परंतु पावसाअभावी पेरणी न झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे.

दरम्यान सोलापुरला ज्वारीचे कोठार म्हणतात परंतु ज्वारी टंचाई निर्माण झाल्याने आतापासूनच भाववाढ होत आहे. सध्या ज्वारीचे भाव ८० रुपये किलोपेक्षा अधिक झाले आहेत. ही स्थिती कायम राहिल्यास ज्वारीचे भाव शंभरीच्या पलीकडे जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. व्यापाऱ्यांनी कर्नाटकात ज्वारी खरेदीसाठी शोध मोहिम सुरु केली आहे.

यावर्षी ज्वारीच्या पिकांच्या बाबतीत मोठी अडचण झाली आहे. मागील वर्षात ज्वारीचे पीक निघाल्यानंतर उत्पादनाचे आकडे फारशे मोठे नव्हते. ज्वारीच्या पट्ट्यात ऊस व इतर पिके घेतली जात असल्याने ज्वारीचे क्षेत्र कमी होत चालले आहे. मागील वर्षात ज्वारीची आवक साधारण झाली. सोलापुरात साधारणपणे मंगळवेढा किंवा मालदांडी, बार्शी ज्वारी प्रामुख्याने मानली जाते. या शिवाय बाजारात गुणवत्तेनुसार पाच नंबर, बारा नंबर, दहा नंबर किंवा दूरी असे प्रकार मिळतात.

पण आता यावर्षी गंभीर स्थिती झाली आहे. मागील वर्षीचा माल संपत चालला आहे. यावर्षी कधी नव्हे ते पहिल्यांदाच ज्वारी पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाल्याचा प्रकार घडला. हे नुकसान कमी की काय म्हणून या पिकाला पुन्हा अवकाळीने झोडपले.

या स्थितीत आता ज्वारीचे पीक पुढील काळात कितपत हाताशी येईल याची शंका आहे. स्थानिक शेतकऱ्यांकडे कोणताही माल शिल्लक नाही. पुढे नवीन आवक सुरु होण्यास किमान दोन महिन्याचा कालावधी लागणार आहे.

त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांनी कर्नाटकात ज्वारीचा शोध सुरु केला आहे. कर्नाटकातील मोठ्या व्यापाऱ्यांची संपर्क साधून ज्वारीचा साठा काही प्रमाणात मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. तोपर्यंत ज्वारीची बाजारपेठेतील मागणी भागवण्याची अडचण झाली आहे.

प्रत्यक्षात वारांचे कोठार मानलेल्या सोलापूर जिल्ह्यात ही स्थिती झाली तर अन्यत्र ज्वारीचे भाव आणखी महागण्याची शक्यता आहे. कदाचित संक्रांतीनंतर नव्या मालाच्या आवकीने काही प्रमाणात स्थिती बदलेल असे मानले जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना दोन हप्ते एकदम?; मार्च, एप्रिलचा ७३० कोटी निधी मंजूर

Soybean Seed Treatment: कमी पावसाच्या संकटात सोयाबीन लागवडीपूर्वीचे नियोजन कसे करावे?

Papaya Cultivation: पपई लागवड क्षेत्र १५ हजार हेक्टरवर पोहोचण्याचा अंदाज

Agrowon Podcast: कापसातील तेजी कायम; सोयाबीनमध्ये सुधारणा, कांदा दबावातच तर हळद-हरभरा स्थिर

Water Levels Drop: उन्हामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट

SCROLL FOR NEXT