Poultry Farming Management : मरतूक टाळण्यासाठी अचूक नियोजनावर भर

Success Story of Poultry Farming : नियमित आर्थिक आवक सुरू राहावी, या उद्देशाने शेतीपूरक कुक्कटपालन व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. परिसरातील पोल्ट्री शेड व चांगल्या शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन या व्यवसायातील बारकावे, अर्थशास्त्र समजून घेतले.
Poultry Farming
Poultry FarmingAgrowon
Published on
Updated on

शेतकरी : शरद यशवंत घाडगे

Poultry Business : शरद यशवंत घाडगे यांच्याकडे पाच एकर बागायत शेती आहे. त्यात ऊस, आले ही प्रमुख पिके असून, अन्य हंगामी पिके घेत असतात. त्यांनी पदवीधर झाल्यावर पूर्ण वेळ शेती करण्यास सुरुवात केली. त्या वेळी त्यांच्याकडे उसाचे क्षेत्र जास्त होते.

यामुळे वर्षातून एकदाच पैशाची आवक होत असे. त्यामुळे नियमित आर्थिक आवक सुरू राहावी, या उद्देशाने शेतीपूरक कुक्कटपालन व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. परिसरातील पोल्ट्री शेड व चांगल्या शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन या व्यवसायातील बारकावे, अर्थशास्त्र समजून घेतले.

त्यानंतर शरद घाडगे यांनी स्वतःच्या क्षेत्रात ३० फूट बाय १५० फूट या आकाराच्या शेडची उभारणी केली. त्याची क्षमता चार हजार पक्ष्यांची आहे. एका खासगी कंपनीशी करार केला आहे.

कितीही अभ्यास केला तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्यानंतर त्यातील एकेक अडचण, समस्या समजत गेल्या. २०१९ मध्ये हा व्यवसाय सुरू केल्यानंतर सर्वांत महत्त्वाची अडचण आली ती कोरोनामुळे झालेल्या टाळेबंदीची. पणत्यातही सकारात्मक राहत व्यवसाय सुरू ठेवला.

Poultry Farming
Poultry Management : थंडीच्या काळातील कोंबड्यांचे व्यवस्थापन

व्यवसायाचे हे चौथे वर्ष आहे. यातून वर्षाकाठी दीड लाख ते एक लाख ८० हजार रुपये मिळतात. या उत्पन्नाला पोल्ट्री खताच्या विक्रीची जोड मिळते. वर्षाकाठी चारचाकी ट्रॅक्टरचे १२ ट्रेलर इतके कोंबडी खत मिळते.

विक्रीसोबत स्वतःच्या शेतातही मोठ्या प्रमाणात पोल्ट्री खतांचा वापर केला जातो. त्यामुळे पिकांच्या उत्पादनात भरीव वाढ झाली आहे. सोबतच जमिनीचा पोत सुधारला आहे. या व्यवसाय सातत्याने पत्नी विजया व मोठे बंधू धनंजय यांची मदत होत असते.

व्यवस्थापनातील बाबी :

वर्षाकाठी सरासरी पाच बॅच घेतात

पक्ष्याची बॅच गेल्यानंतर कोंबडी खत काढले जाते

रोगप्रतिबंधक उपाययोजना म्हणून शेड स्वच्छ केले जाते.

शेड निर्जंतुकीकरण केल्यानंतर चुन्याचा वापर केला जातो. तसेच सर्व शेड्याची फॉगिंगद्वारे फवारणी केली जाते.

शेडमध्ये भाताचा तुसाचा वापर केला जातो.

Poultry Farming
Poultry Policy : खाण्यायोग्य कोंबडीच्या वजनासाठी ठरणार धोरण ; ‘पशुसंवर्धन’ने मागितला ‘माफसू’कडे अहवाल

खाद्याची भांडी, इतर साहित्य स्वच्छ करून भांडीदेखील निर्जंतुकीकरण केले.

पक्षी आल्यानंतर पहिले तीन दिवस गूळ पाणी दिले जाते.

लहान पक्ष्यांना प्रजिजैविक औषध सायंकाळी तीन दिवस दिले जाते.

जसजसे पक्षी मोठे होत जातात, तशी जागा त्यांना अधिक जागा उपलब्ध करून दिली जाते.

शेडमधील वातावरण स्वच्छ व प्रसन्न ठेवले जाते. त्यामुळे पक्ष्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

पक्ष्यांच्या विष्ठेमुळे दुर्गंधी येऊ नये, यासाठी दररोज भाताचे तूस हलवले जाते.

पिलांना पहिली लस सातव्या दिवशी दिली जाते, दुसरी लस १४ व्या दिवशी देतो, तर तिसरी लस २१ व्या दिवशी पाण्यातून दिली जाते

लसीकरण करताना सहा तास अगोदर आणि सहा तासानंतर साधे पाणी पक्ष्यांना दिले जाते.

दररोज दोन वेळा खाद्य दिले जाते. सकाळी साडेसात व सायंकाळी पाच वाजता पक्ष्यांना खाद्य दिले जाते.

करार केलेल्या कंपनीकडूनही पक्ष्यांच्या खाद्य आणि आरोग्यासंदर्भात मार्गदर्शन व मदत मिळते.

चारही बाजूंना २०० मायक्रॉन प्लॅस्टिक कागदाचा वापर केला जातो.

वातावरणानुसार शेडमधील तापमानाचे नियोजन केले जाते.

करार पद्धतीमुळे एक ठरलेला दर मिळतो. त्यात फारसा बदल होत नाही.

पोल्ट्रीतील प्रत्येक काम वेळेवर करण्यावर भर असतो. त्यामुळे पक्ष्यांची वाढ चांगली होते. मरतूक कमी राहून उत्पन्नामध्ये वाढ होते.

शरद यशवंत घाडगे, ९७६३०७४६७४

(शब्दांकन : विकास जाधव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com