Talathi Bharti Agrowon
ॲग्रो विशेष

Talathi Bharti : तलाठी भरतीमधील काही निकाल रोखले

मनोज कापडे

Pune News : राज्यातील लाखो उमेदवारांचे लक्ष लागून असलेल्या तलाठी भरतीमधील निवड यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र काही उमेदवारांचे निकाल राखून ठेवण्यात आले आहेत. राज्यात तलाठी पदाच्या ४७९३ रिक्त जागांसाठी ८.६४ लाख उमेदवारांनी परीक्षा दिली होती. भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांनी गंभीर हरकती घेतल्या.

तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिकादेखील दाखल केली. न्यायालयाने देखील याचिकेतील मुद्द्यांची दखल घेत उमेदवारांच्या तक्रारींचे निवारण करण्याचे आदेश दिले. त्यामुळे राज्य शासनाकडून परीक्षा प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यांची बारकाईने छाननी करण्यात आली.

‘‘परीक्षेतील काही उमेदवारांचे निकाल लगेच घोषित केले जाणार नाहीत. त्यांची जिल्हानिहाय यादी घोषित करण्यात आली आहे. तसेच काही उमेदवारांच्या निकालाबाबत प्रत्यक्ष शासनाच्या वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाणार आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.

तलाठी पद महसूल विभागाच्या अखत्यारीत येते. परंतु परीक्षा घेण्याचे काम राज्य शासनाने महसूल विभागाकडे न ठेवता टीसीएस कंपनीला दिले आहे. तसेच समन्वयाची जबाबदारी भूमी अभिलेख खात्यावर सोपवली. विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर यांनी राज्य शासनाला एक पत्र लिहून काही परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार होण्याची शक्यता वर्तविली होती.

टीसीएस (TCS) कंपनीने घेतलेल्या परीक्षेतील प्रश्‍नांवरदेखील आक्षेप घेतले गेले आहेत. भूमी अभिलेख विभागाच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत ५७ सत्रांमध्ये तलाठी पदाच्या परीक्षा घेतल्या गेल्या. त्यानंतर प्रश्‍न व उत्तरांबाबत उमेदवारांकडून आक्षेप आले होते.

ते निकाली काढले गेले. परंतु त्यानंतर या आक्षेपांची आता पुन्हा छाननी करण्यात आली आहे. या छाननीत ७९ प्रश्‍नांबाबत घेतलेले आक्षेप योग्य असल्याचे आढळले आहे. त्यामुळे उत्तरतालिकेतील एकूण २१९ प्रश्‍न अथवा उत्तर सूचीत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेतील ३९ प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आले आहेत. १८० प्रश्‍नांचे पूर्ण गुण त्या सत्रातील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात तलाठी पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेबाबत पेसा क्षेत्राला वगळून निवड यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे.
- सरिता नरके, प्रभारी राज्य परीक्षा समन्वयक, अपर जमाबंदी आयुक्त

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Palm Oil Prices : जागतिक बाजारात पामतेलाचे भाव वाढलेले; मलेशियाला होतोय फायदा

Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

Soybean Subsidy : सोयाबीन अनुदानासाठी आधार संमती पत्र भरून द्या; कृषी सहाय्यकांचं शेतकऱ्यांना आवाहन

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

Groundnut Harvesting : बोरपाडळे परिसरात भुईमूग काढणी सुरू

SCROLL FOR NEXT