DCM Eknath Shinde Agrowon
ॲग्रो विशेष

Eknath Shinde: वडिलांच्या नावावर काही जण बढाया मारतात: एकनाथ शिंदे

Maharashtra Politics Update: शिवसेनेचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (ता. ५) शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांना नाव न घेता टोला लगावला.

Team Agrowon

Solapur News: श्रीमंत घराण्यात जन्माला येऊनदेखील सिद्धाराम म्हेत्रे यांच्यात कधीही श्रीमंतीचा दर्प आला नाही. त्यांच्यात अहंकार आला नाही, ते कायम जमिनीवर राहिले, तर अनेक लोक वडिलांच्या नावावर बढाया मारतात, फुशारक्या मारतात, असा टोला शिवसेनेचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (ता. ५) शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला.

राज्याचे माजी मंत्री व काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे आणि त्यांचे बंधू शंकर म्हेत्रे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्या वेळी अक्कलकोट येथे आयोजित जाहीर सभेत उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. या वेळी मंत्री दादा भुसे, मंत्री संजय राठोड, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की सिद्धाराम म्हेत्रे आणि त्यांचे बंधू शंकर म्हेत्रे ही राम-लक्ष्मणाची जोडी आहे. म्हेत्रे परिवाराला मोठी सामाजिक पार्श्‍वभूमी आहे. त्यांचे वडील सातलिंग्गपा म्हेत्रे इथले मोठे प्रस्थ होते.

म्हेत्रे परिवाराने कधी जात, धर्म, पक्ष पाहिला नाही, आलेल्या माणसाचे काम केले. त्यामुळे इथल्या हिंदू-मुस्लिम बांधवांचा म्हेत्रे परिवाराला कायम पाठिंबा राहिला आहे. आज सिद्धारामजी यांनी काँग्रेसचा हात सोडून शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. जिथे दिशा नाही तिथे दशा झाली, अशी टीका श्री. शिंदे यांनी काँग्रेसवर केली.

सिद्धाराम म्हेत्रे अनुभवी आहेत. त्यांच्या नावात राम आहे. ते शिवसेनेत आल्याने आता सोलापूर, अक्कलकोट, दुधनीचे भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गाव तेथे शाखा, यानुसार काम करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Budget 2026: कोरडवाहू शेतीत कृषी संलग्न व्यवसायाला चालना

Agri Union Budget 2026: अन्नदाता शेतकऱ्यांचा भ्रमनिरास

Union Budget 2026: शेती बेदखलच!

Union Budget 2026: आर्थिक वाढीसाठी सर्वंकष प्रयत्नांचा संकल्प

Agriculture Union Budget: अन्नदाता शेतकरी पुन्हा एकदा वाऱ्यावर...!

SCROLL FOR NEXT