Solar Energy Systems Agrowon
ॲग्रो विशेष

Solar Project : सव्वा तीन हजार ग्राहकांच्या घरांवर सौरऊर्जा यंत्रणा

Solar Energy System : अकोला जिल्ह्यातील ३ हजार १७० ग्राहकांनी छतावर सौरऊर्जा यंत्रणा बसवली आहे. यामध्ये ३५९ ग्रामीण, शहरी २५८३ आणि अकोट येथे २२८ ग्राहक सौर यंत्रणेचा लाभ घेत आहेत.

Team Agrowon

Akola News : पारंपरिक ऊर्जा साधनावरील भार कमी करण्यासाठी सौरऊर्जेचा वापर करण्यावर जोर दिला जात आहे. याबाबत जागृती केली जात असून, त्याचा परिणाम दिसून येत आहे. जिल्ह्यातील ३ हजार १७० ग्राहकांनी छतावर सौरऊर्जा यंत्रणा बसवली आहे. यामध्ये ३५९ ग्रामीण, शहरी २५८३ आणि अकोट येथे २२८ ग्राहक सौर यंत्रणेचा लाभ घेत आहेत.

सौरऊर्जेपासून वीज निर्मिती होत असल्यामुळे संबंधित ग्राहकांना वीजबिल कमी येत आहे. शिवाय यामुळे परंपरागत साधनांवरील ताण कमी झाला. सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेतून वीज निर्मितीची यंत्रणा बसविण्याबाबत गेल्या काही वर्षांपासून जागृती होत आहे. यामुळे अनेक ग्राहकांच्या वीज बिलांचा भार कमी झाला आहे. नाममात्र देयक महिन्याकाठी येत असल्यामुळे परंपरागत विजेची बचत होऊ लागली आहे.

पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेत केंद्र सरकारकडून छतावरील सौरऊर्जा निर्मितीचे रूफ टॉप सोलर प्रकल्प बसवणाऱ्या वीज ग्राहकांना ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. एक किलोवॉट क्षमतेच्या प्रकल्पाला तीस हजार रुपये, दोन किलोवॉट क्षमतेच्या प्रकल्पाला साठ हजार रुपये व तीन किलोवॉट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या प्रकल्पाला ७८ हजार रुपये अनुदान मिळते.

छतावरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पात निर्माण झालेली वीज घरामध्ये वापरासोबतच प्रकल्पात गरजेपेक्षा अधिक वीज निर्माण झाल्यामुळे वीज बिल शून्य येते तसेच अतिरिक्त वीज महावितरणला विकता येते, अशी ही योजना आहे. योजनेत जूनपर्यंत ६४ हजार रूफ टॉप सोलर बसवण्याचे महावितरणचे उद्दिष्ट आहे. अकोला विभागात एकूण ३ हजार १७० ग्राहकांनी छतावर सौर ऊर्जा यंत्रणा बसवली आहे. त्यामुळे वीज बचत होण्यास मदत झाली आहे.-

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Second List: कर्जमाफीची दुसरी यादी प्रसिद्ध, ३ लाख ५५ हजार ६१४ पात्र शेतकऱ्यांचा समावेश

Agriculture Graduates Issues: कृषी पदवीधर, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कृषिमंत्र्यांची भेट

Silk Farming: रेशीम शेतीतून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाची संधी : डॉ. महेंद्र ढवळे

Shetkari Samruddhi Kisan Rail: ‘शेतकरी समृद्धी’ किसान रेल नावालाच!

Sugarcane Price Protest: ऊस दर जाहीर न करताच जॅगरी प्रकल्प सुरू, 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली

SCROLL FOR NEXT