Rooftop Solar Scheme : रूफ टॉप सोलर बसवा, मोफत वीज मिळवा

Free Electricity : घराच्या छपरावर रूफ टॉप सोलर सिस्टिम बसवून ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळविण्यासाठी पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेत ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळत आहे.
Rooftop Solar Scheme
Rooftop Solar Scheme Agrowon

Baramati News : घराच्या छपरावर रूफ टॉप सोलर सिस्टिम बसवून ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळविण्यासाठी पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेत ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळत आहे. वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी केले आहे.

श्री. पावडे म्हणाले, की वीज ग्राहकांना मोफत वीज मिळवून देणाऱ्या या योजनेची अंमलबजावणी तातडीने करण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला केली आहे. रूफ टॉप सोलर सिस्टिमसाठी केंद्र सरकारकडून वीज ग्राहकाला एक किलोवॉटसाठी तीस हजार रुपये, दोन किलोवॉटसाठी साठ हजार रुपये व तीन किलोवॉटसाठी ७८ हजार रुपये अनुदान थेट मिळते. वीज ग्राहकांनी कितीही क्षमतेची रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविली तरी जास्तीत जास्त एकूण अनुदान प्रती ग्राहक ७८ हजार रुपये इतके निश्चित केलेले आहे.

Rooftop Solar Scheme
Solar Agriculture Scheme : शेतकऱ्यांना आता मिळणार दिवसा वीज, महावितरणची नवी योजना

महाराष्ट्रात वीज ग्राहकांना रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविण्यासाठी महावितरण मदत करते. ग्राहकांनी https://pmsuryaghar.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे गरजेचे आहे. पीएम सूर्यघर नावाचे मोबाईल ॲपही यासाठी उपलब्ध आहे. देशभरात एक कोटी घरांसाठी ही योजना सुरू केलेली असून राज्यातील ग्राहकांनी योजनेचा लवकरात लवकर लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Rooftop Solar Scheme
Kusum Solar Scheme : कुसुम योजनेच्या बनावट वेबसाईट्सचा सुळसुळाट ; शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन

एक किलोवॅट क्षमतेच्या रूफ टॉप सोलर सिस्टिममधून दररोज सुमारे चार युनिट अर्थात दरमहा सुमारे १२० युनिट वीज तयार होते. महिना दीडशे युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या कुटुंबाला दोन किलोवॉटपर्यंतच्या क्षमतेची रूफ टॉप सोलर सिस्टिम पुरेशी आहे. दरमहा दीडशे ते तीनशे युनिट वीज वापर असणाऱ्या कुटुंबासाठी दोन ते तीन किलोवॅट क्षमतेची सिस्टिम पुरेशी ठरते.

घराच्या छतावर रूफ टॉप सोलर वीजनिर्मिती प्रकल्प बसवून सौरऊर्जेचा वापर करून वीजनिर्मिती करायची व ती वीज घरी वापरून विजेची गरज पूर्ण करायची, अशी ही योजना आहे. यामध्ये गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यामुळे वीजबिल शून्य येते अर्थात वीज मोफत मिळते व जास्तीची वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com