Solar Pump Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Solar Pump Scheme : नाशिक जिल्ह्यात ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेला प्रतिसाद

Agriculture Solar Pump Scheme : चौदा दिवसांत जिल्ह्यातील १ लाख २२ हजार शेतकऱ्यांची महावितरणच्या संकेतस्थळावर नोंदणी.

Team Agrowon

Nashik News: ‘मागेल त्याला सौर कृषिपंपर’ योजनेत शेतकऱ्यांनी अर्ज करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुरू केलेल्या महावितरणच्या वेबसाइटला उदंड प्रतिसाद मिळाला असून केवळ चौदा दिवसांत १ लाख २२ हजार शेतकऱ्यांनी त्यावर नोंदणी केली, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.

राज्य सरकारने मागेल त्याला सौर कृषिपंप ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करता यावा यासाठी महावितरणने वेबसाइट तयार केली आहे.

१३ सप्टेंबर रोजी संकेतस्थळ सुरू झाल्यानंतर केवळ १४ दिवसांत (ता. २७ सप्टेंबरअखेर) राज्यातील १ लाख २२ हजार ४२१ शेतकऱ्यांनी संकेतस्थळावर अर्ज दाखल केले होते. ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेत संकेतस्थळावर अर्ज दाखल करण्यामध्ये जालना जिल्ह्याने बाजी मारली. जालना जिल्ह्यातून ५२,०६७ अर्ज दाखल झाले आहेत.

त्यानंतर राज्यात मराठवाड्यातील बीड (२४,५२६ अर्ज), परभणी (१५,०४३ अर्ज), छत्रपती संभाजीनगर (६,८८८ अर्ज) आणि हिंगोली (५,०७९ अर्ज) या जिल्ह्यांचा क्रम लागतो. या योजनेत शेतकऱ्यांना जमिनीच्या क्षेत्रफळानुसार तीन ते साडेसात एचपीपर्यंतचे पंप मंजूर होतात.

शेतकऱ्यांना सौर ऊर्जानिर्मिती पॅनेल्स व कृषिपंप असा सर्व संच केवळ दहा टक्के रक्कम भरून मिळतो. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा केवळ पाच टक्के आहे. शेतकऱ्यांना ऊर्वरित रक्कम केंद्र व राज्य सरकारकडून सबसिडीच्या स्वरूपात मिळते.

सौर ऊर्जानिर्मिती पॅनेल्समधून २५ वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने एकदा संच बसविला की, शेतकऱ्याला २५ वर्षे हक्काचे व स्वतंत्र सिंचनाचे साधन मिळते. शेतकरी पारंपरिक ग्रीडमधून मिळणाऱ्या वीज पुरवठ्यावर अवलंबून राहत नाहीत तसेच बिलही येत नाही. सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना सोईचे होते. राज्य सरकाच्या योजनेला शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत आहे.

या संकेतस्थळावर नोंदणी करा

मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी https://www. mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.php या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज दाखल करावा. वेबसाइटवर योजनेविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. तसेच शेतकरी वीज ग्राहकांचे शंका समाधान करण्यासाठी सविस्तर प्रश्नोत्तरेही आहेत. अर्ज दाखल केल्यानंतर पुढील प्रगतीची माहितीही वेबसाइटवर तपासता येते, असे जनसंपर्क विभागाने कळविले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming: साठवलेला कांदा सडू लागल्याने शेतकरी अडचणीत  

Farmer Cup: ‘फार्मर कप’द्वारे १५ हजार शेतकरी गट होणार: मुख्यमंत्री

Fenugreek Farming: मेथी पिकाकडे शेतकऱ्यांचा वाढतोय कल

Rain Crop Damage: पाऊस सुरूच, उडीद पीक गेले हातचे

Pune APMC Corruption: पुणे बाजार समितीत २०० कोटींचा गैरव्यवहार: रोहित पवार

SCROLL FOR NEXT