Solapur madha Lok Sabha agrowon
ॲग्रो विशेष

Solapur Lok Sabha : सोलापुरात परिवर्तनाच्या चर्चांना उधाण पण दुष्काळाच्या मुद्याला पूर्णविराम, जनतेची नाराजी

Madha Lok Sabha : माढा लोकसभा मतदारसंघ आणि सोलापूर मतदार संघात काटाजोड लढती होताना दिसत आहेत.

sandeep Shirguppe

Solapur Drought Election : लोकशाहीचा उत्सव लोकसभेच्या निवडणुकीला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली आहे. दरम्यान महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली आहे. वाढत्या तापमानामुळे मतदानाचा टक्का घसरल्याने प्रशासन वेगवेगळ्या स्तरावर मतदान करण्याचे आवाहन करत आहे. तसेच महाराष्ट्रात विदर्भानंतर सर्वाधिक उन्हाच्या झळा मराठवाड्यातील सोलापूर जिल्ह्यात बसतात. यामध्ये उन्हाच्या झळांबरोबर सोलापूर जिल्ह्यातील लोकसभेचे रणांगणही तापू लागले आहे.

माढा लोकसभा मतदारसंघ आणि सोलापूर मतदार संघात काटाजोड लढती होताना दिसत आहेत. या लढतीत सोलापूर जिल्ह्यात भीषण दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. यावर कोणत्याही नेत्यांकडून भाष्य होताना दिसत नाही. यामुळे यंदाच्या लोकसभेच दुष्काळाचा मुद्द्यावरून जनता कोणाच्या बाजूने कौल देणार हा येणारा काळ ठरवणार आहे.

माढा लोकसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या करमाळा तालुक्यातील कंदर, केम, वरकुटे, बिटरगाव, कविटगावचा काही बागायती क्षेत्र वगळता इतर गावांचा म्हणावा तसा विकास झाला नाही. येथील मतदारांना वीज, पाणी तसेच रस्त्यांचे प्रश्न भेडसावत आहेत.

यामुळे माढा लोकसभा निवडणुकीत आता परिवर्तनाच्या चर्चांना उधाण आल्याने करमाळा तालुक्यात कमळ बॅकफूटवर तर तुतारीला पोषक वातावरण असल्याचे चित्र आहे. शिवाय ही गावे दुष्काळाच्या छायेत असल्याने त्यामुळेही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

पाच वर्षात विद्यमान खासदारांना न पाहिलेल्या करमाळा तालुक्यातील मतदारांच्या मनात आता शरद पवारांच्या तुतारीवाला माणूस चिन्हाला सहानुभूती असल्याचे चर्चेतून चित्र पाहायला मिळते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी पाणी, वीज आणि रस्त्याचे प्रश्न जिव्हाळ्याचे असतात.

परंतु ते प्रलंबित असल्याने शेतकरी वर्ग कोणाला साथ देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. गावपातळीवर चावडीच्या फडात रंगत असलेल्या चर्चामध्ये परिवर्तनाची लाट दिसून येते आहे. करमाळा तालुक्यातील मतदार आता भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर की शरद पवार गटाच्या माध्यमातून तुतारी हाती घेतलेल्या धैर्यशील यांना साथ देतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मोहिते-पाटलांची व्यूहरचना महत्त्वाची

आगामी विधानसभेच्या अनुषंगाने माढा लोकसभेच्या निवडणुकीत विजयसिंह मोहिते-पाटलांची व्यूहरचना महत्त्वाची ठरणार असल्याची प्रतिक्रिया गावपातळीवरील तरुणांनी दिली. माढा तसेच करमाळा विधानसभा मतदारसंघात आमदार शिंदे बंधूंना आव्हान देण्यासाठी मोहिते-पाटलांचा एक सक्रिय गट असल्याचे बोलले जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Ownership: जमीन भोगवटादार अन् मालकी हक्क

Manikrao Kokate: शह-काटशहचे बळी कोकाटे

SMART Agri Project: ‘स्मार्ट’ पाऊल पुढे पडो

Alampatti Dam: कर्नाटकने अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये : मुख्यमंत्री

Ajit Pawar: विनंती करतो, जनतेला हेलपाटे मारण्यास लावू नका: अजित पवार

SCROLL FOR NEXT