Solapur APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Solapur APMC : सोलापूर बाजार समितीत ११ नव्या पिकांचे नियमन

Crop Regulations : राज्यात भाजीपाल्यासह कांदा लिलावात आघाडीवर असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने आता आणखी ११ नव्या शेती उत्पादनांचे लिलाव नियमनाखाली आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Team Agrowon

Solapur News : राज्यात भाजीपाल्यासह कांदा लिलावात आघाडीवर असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने आता आणखी ११ नव्या शेती उत्पादनांचे लिलाव नियमनाखाली आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामध्ये रेशीम कोष, ड्रॅगन फळ, जांभूळ, कच्चा खजूर, किव्ही, आलु बुखार, पेर, काळी मैना, बीट, बिन्स आणि तांदूळसा भाजी यांचा समावेश आहे.

बाजार समितीने २१ जुलै रोजी अधिसूचना प्रसिद्ध करून या नव्या उत्पादनांना नियमनाखाली आणले असून, त्यामुळे यापुढे या उत्पादनांच्या खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांचा योग्य दर मिळवून देण्यासाठी बाजार समिती अधिक जबाबदार राहणार आहे.

याबाबत बोलताना बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, "या निर्णयामुळे सोलापूरसह शेजारच्या जिल्ह्यांतील शेती उत्पादनांना नवसंजीवनी मिळणार आहे. विशेषतः रेशीम कोषाच्या नियमनामुळे रेशीम शेतीला चालना मिळेल.

सध्या सोलापूर बाजार समितीत ५८ शेती उत्पादनांचे नियमन करण्यात येत असून, आता नव्याने ११ पिकांचा समावेश झाल्याने एकूण नियमनातील उत्पादनांची संख्या ६९ वर जाऊन पोहोचली आहे, असेही सभापती माने यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना होणार फायदा...

या निर्णयामुळे शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार असून, बाजार समितीला देखील सेसच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळणार आहेत, यापूर्वी हे व्यवहार अनौपचारिक पद्धतीने होत असल्याने बाजार समितीला कोणतेही अधिकार नव्हते.

आता मात्र व्यवहारात फसवणूक झाल्यास समिती कायदेशीर हस्तक्षेप करू शकेल. या पार्श्वभूमीवर, उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज येथे स्थापन झालेल्या रेशीम पार्क मुळे सोलापूरसह शेजारील जिल्ह्यांत रेशीम शेतीचे प्रमाण वाढले आहे, अशा वेळी रेशीम कोषाला नियमनात स्थान मिळाल्यामुळे या क्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Accident Scheme: तीस दिवसांच्या अटीऐवजी १२० दिवसांच्या मुदतीचा प्रस्ताव

Godavari Flood Management : गोदावरी पूरप्रश्नी कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर

Green Monsoon Drive : ‘ग्रीन मॉन्सून’ अंतर्गत दऱ्याई माता परिसरात ५ हजार देशी वृक्षांचे रोपण

Jalyukt Shivar Abhiyan: जलयुक्त शिवार योजनेची ६२२ कामे अंतिम टप्प्यात

District Central Bank : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने दिली ४५८१ सभासदांची यादी

SCROLL FOR NEXT