Solapur APMC : अडत्याला वाचविण्याची प्रशासनाची धडपड

Farmers Exploitation : शेतमाल विक्री झाल्यानंतर शेतकऱ्यांकडून बेकायदेशीर दोन टक्के अडत वसूल केल्याच्या प्रकरणाचा खुलासा बाजार समिती प्रशासनाला प्राप्त झाला आहे.
Solapur APMC
Solapur APMC Agrowon
Published on
Updated on

Solapur News : शेतमाल विक्री झाल्यानंतर शेतकऱ्यांकडून बेकायदेशीर दोन टक्के अडत वसूल केल्याच्या प्रकरणाचा खुलासा बाजार समिती प्रशासनाला प्राप्त झाला आहे. चुकून दुसऱ्या शेतकऱ्याची उचल पावतीवर लागल्याचा दावा अडत्याने खुलाशात केला आहे. आणि हाच खुलासा प्रशासनाने मान्य करत प्रकरण संपवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

मंद्रूप येथील एका शेतकऱ्याने बारा एप्रिल रोजी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कलिंगडे विक्रीसाठी आणली होती. विक्रीनंतर शेतकऱ्याकडून पावतीवर दोन टक्के आडत कपात करण्यात आली. यानंतर या शेतकऱ्याने बाजार समितीकडे लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर बाजार समिती प्रशासनाने संबंधित अडत्याला नोटीस बजावली होती.

पहिल्या नोटिशीला संबंधित अडत्याने उत्तर दिले नाही. अंतिम व दुसऱ्या नोटिशीनंतर अडत्याने तक्रारदार शेतकऱ्यांच्या पावतीवर झालेली कपात ही दुसऱ्या शेतकऱ्याची असून नजरचुकीने तक्रारदार शेतकऱ्यांच्या पावतीवर नमूद करण्यात आली असल्याचा दावा केला. आणि त्यांच्या या खुलाशानंतर बाजार समिती प्रशासनाने अद्याप या प्रकरणात कुठलीच कारवाई केली नाही.

Solapur APMC
Umred APMC : उमरेड बाजार समिती राज्यात सातव्या स्थानी

बाजार समितीमध्ये शेतकऱ्याकडून सर्रास दोन टक्के अडत वसूल केली जाते. त्याचबरोबर कॅरेट भाडे व इतर बाबींच्या नावावरही मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रक्कम वसूल केली जाते. हा सारा प्रकार बाजार समिती प्रशासनाच्या आशीर्वादाने चालतो. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित अडत्याची पावती पुस्तक तपासल्यास सर्व शेतकऱ्यांकडून अडत वसूल केली जात असल्याचे दिसून आले असते.

Solapur APMC
Solapur APMC Election : भाजप विरुद्ध भाजप लढतीत विजय काँग्रेसचाच

मात्र प्रशासनाचे अधिकारी, असे काही आढळून आले नसल्याचा दावा करत आहेत. याबाबत पडताळणी केली असता बाजार समिती प्रशासनाचे अधिकारी खोटी माहिती पुरवून संबंधित अडत्याला वाचवत असल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणात तत्कालीन प्रशासक प्रगती बागल यांनीही कुठलीही ठोस कारवाई केल्याचे दिसून आले नाही. यामुळे इतर प्रकरणाप्रमाणे हेही प्रकरण कारवाईविना बंद होण्याची शक्यता आहे.

संबंधित अडत्याचा खुलासा आला आहे. आमच्या कर्मचाऱ्यांच्या तपासणी अहवालानुसार तक्रारदार शेतकरी वगळता इतर कुठल्याच पावतीवर कपात केलेली दिसून आली नाही. या प्रकरणात पुढील कारवाई होईल.
- दत्तात्रय सूर्यवंशी, सचिव, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती
अपवाद वगळता अडते शेतकऱ्यांकडून बेकायदेशीर अडत वसूल करतात. यात बाजार समिती प्रशासन स्वतःहून कुठलीच कारवाई करत नाही. त्याचबरोबर तक्रार दाखल झाल्यानंतरही कारवाईत चालढकल होते. यामुळे हा प्रकार निरंतर सुरू आहे. अद्याप माझ्या प्रकरणात कुठलीच कारवाई केली नाही.
- रवी म्हेत्रे, तक्रारदार, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com