Solapur APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Solapur APMC : सोलापूर बाजार समितीच्या सभापती, उपसभापतिपदाची आज निवड

APMC Market Update : निवडणुकीत भाजपचे आमदार कल्याणशेट्टी यांनी काँग्रेस नेते, माजी आमदार माने, हसापुरे, शिवदारे यांच्यासह पॅनेल उभा करत निवडणूक लढवली आणि बहुमतही मिळवले.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीची निवड आज (ता. ११) होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विजयी झालेल्या सिद्धेश्‍वर विकास पॅनेलमधील काँग्रेस नेते, माजी आमदार दिलीप माने, काँग्रेस नेते सुरेश हसापुरे, माजी सभापती राजशेखर शिवदारे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

दरम्यान, सभापतिपदासाठी माजी आमदार दिलीप माने यांचे नाव निश्‍चित झाले असल्याचे सांगण्यात आले. निवडणुकीत भाजपचे आमदार कल्याणशेट्टी यांनी काँग्रेस नेते, माजी आमदार माने, हसापुरे, शिवदारे यांच्यासह पॅनेल उभा करत निवडणूक लढवली आणि बहुमतही मिळवले.

तर त्यांच्या विरोधात भाजपचेच दुसरे आमदार सुभाष देशमुख यांनी त्यांना आव्हान देत निवडणूक लढवत तीन जागा मिळवल्या. परंतु आता आमदार कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलकडे सत्ता जाणार असली, तरी सभापती, उपसभापती कोण, हा चर्चेचा विषय झाला होता.

याच विषयावर चर्चेसाठी या नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन, सर्व परिस्थिती सांगितली. त्या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मी तुमच्यासोबत आहे, तुम्ही सर्व जण मिळून काम करा, सभापतीचा निर्णय समन्वयाने घ्या, असे सांगितले.

त्यानंतर झालेल्या चर्चेनंतर माजी आमदार दिलीप माने यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात आले. तसेच उपसभापतिपदी अनिता विभूते यांचे नाव ठरवण्याचे सांगण्यात आले. पण असे असले, तरी आता अधिकृतपणे उद्याच यावर निर्णय होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT