Uday Samant Agrowon
ॲग्रो विशेष

Barsu Refinery : बारसू रिफायनरीसाठीचे माती परीक्षण पूर्ण : उदय सामंत

Soil Testing : बारसू (ता. राजापूर) रिफायनरीसाठी सुरू असलेले माती परीक्षण पूर्ण झाले आहे. धूतपापेश्‍वर गावातील ग्रामस्थांनीही आता समर्थन दिले आहे.

Team Agrowon

Uday Samant News : ‘‘बारसू (ता. राजापूर) रिफायनरीसाठी सुरू असलेले माती परीक्षण पूर्ण झाले आहे. धूतपापेश्‍वर गावातील ग्रामस्थांनीही आता समर्थन दिले आहे. अन्य गावातील लोकांना विश्‍वासात घेऊनच हा प्रकल्प मार्गी लावला जाईल,’’ असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरीत पत्रकारांशी संवाद साधताना सामंत म्हणाले, ‘‘बारसू परिसरातील गावांमध्ये माती परीक्षणासाठी बोअर खोदण्याचे काम आता पूर्ण होत आले आहे. जवळपास ७५ बोअर खणण्यात आल्या आहेत.

पोलिस यंत्रणा, महसूल प्रशासन या ठिकाणी ग्रामस्थांना विश्‍वासात घेण्यासाठी सातत्याने संपर्क ठेवून आहे. आतापर्यंत जिल्हा प्रशासनाने सात ते आठ बैठका येथील ग्रामस्थांसोबत आयोजित केल्या होत्या.

बारसू परिसरातील अगदी मोजकेच ग्रामस्थ विरोध करण्यात होते. मात्र आजूबाजूच्या गावांतील ग्रामस्थांची संख्या अधिक होती, अशी माहिती प्रशासनाकडून उपलब्ध झाली आहे.’’

‘‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ग्रामस्थांना विश्‍वासात घेऊन हा प्रकल्प करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनीही रिफायनरीच्या सुरक्षिततेची माहिती घेतली आहे. प्रशासनासोबतही त्यांनी संपर्क केला असून, येथील परिस्थिती जाणून घेतली आहे,’’ असे सामंत म्हणाले.

'ग्रामस्थांच्या मागण्यांचा होणार योग्य विचार’

‘‘धूतपापेश्‍वर गावातील ग्रामस्थांनीही आता या प्रकल्पाला समर्थन दिले आहे. मात्र काही मागण्या प्रशासनासमोर ठेवल्या आहेत. त्यांच्या मागण्यांचा योग्य विचार केला जाईल,’’ असे आश्‍वासन सामंत यांनी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT