Pocra Project Agrowon
ॲग्रो विशेष

POCRA Project : ‘पोकरा’अंतर्गत अकोल्यातील ८३ गावांचे सामाजिक अंकेक्षण

Social Survey : अकोला जिल्ह्यातील ८३ गावांमध्ये प्रकल्पाच्या निकष व नियमानुसार पुन्हा सामाजिक अंकेक्षण करून त्याचा सविस्तर अहवाल प्रकल्पाच्या मुख्यालयातून मागविण्यात आला आहे.

Team Agrowon

Akola News : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात समाविष्ट गावांमधील काही गट, शेतकरी कंपन्यांनी घेतलेल्या अवजारांना पाय फुटल्याचा मुद्दा सर्वत्र गाजत आहे. या प्रकरणात चौकशी होऊन वसुलीची कार्यवाही केली जात आहे.

आता जिल्ह्यातील ८३ गावांमध्ये प्रकल्पाच्या निकष व नियमानुसार पुन्हा सामाजिक अंकेक्षण करून त्याचा सविस्तर अहवाल प्रकल्पाच्या मुख्यालयातून मागविण्यात आला आहे. यासाठी संबंधित गावांमध्ये ग्रामसभा घेतल्या जाणार आहेत. या ग्रामसभा अनुदानित यंत्र, अवजारे जागेवर आहे किंवा नाही तसेच त्याचा वापर लाभार्थ्यांना दिला जातो का, याचीही खातरजमा करतील.

अकोला जिल्ह्यांचे कृषी अवजारांचा विषय विधानसभेतही गाजला. कमी अवजारे आढळून आलेल्या ८३ गावांपैकी ७४ गावांचे सामाजिक अंकेक्षण पूर्ण झाले आहे. त्यापैकी ९ गावांचे (निंभोरा, जऊळका, देवरी, कुंडा, कोथरी खुर्द, देगाव, बारलिंगा, हिंगणी, खापरखेड) सामाजिक अंकेक्षण बाकी आहे. आजवर सामाजिक अंकेक्षण पूर्ण झालेल्या ७४ गावांपैकी ४१ गावांचे इतिवृत्त प्रकल्प कक्षास मिळालेले आहे. परंतु सद्यःस्थितीत अवजारे जागेवर आहे किंवा नाही याची खात्री केल्याचे आढळून येत नाही, असे स्पष्ट मत मांडण्यात आले.

ग्रामसभा ठरवतील भविष्य

प्रत्येक सामाजिक अंकेक्षणासाठी ग्रामसभा आवश्‍यक आहे. या ग्रामसभेला तालुका अथवा जिल्हा स्तरावरील वरिष्ठ अधिकारी हे निरीक्षक म्हणून उपस्थित राहतील. कृषी सहाय्यक आणि समूह सहायकांनी सामाजिक अंकेक्षणासाठी आयोजित केलेल्या ग्रामसभेस लाभार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित राहण्याबाबत खातरजमा करण्याची सूचना देण्यात आली आहे.

आवश्यकतेपेक्षा कमी उपस्थिती आढळल्यास त्याची जबाबदारी संबंधित कृषी सहायक आणि समूह सहायकाची राहील. या ग्रामसभेस महिला लाभार्थ्यांची उपस्थिती सुद्धा जास्त राहील, यावर भर द्यावा. ग्रामसभेने आता सामुदायिक लाभांच्या घटकांचे साहित्य हे जागेवर आहे का आणि त्या साहित्याचा लाभ लाभार्थी घेतात का याची खातरजमा करावी. साहित्य जागेवर नसेलतर त्याची नोंद ग्रामसभेच्या इतिवृतामध्ये करावी. ग्रामसभांचे व्हीडीओ रेकॉर्डिंगच्याही सूचना आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

SCROLL FOR NEXT