Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Nanded Crop Loan Update : नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत पीककर्ज तीस टक्केच वाटप

Crop Loans Distribution : नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामासाठी १८१२ कोटी रुपयांचे शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने बँकांना दिले आहे.

Team Agrowon

Nanded Crop Loan News : नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामासाठी १८१२ कोटी रुपयांचे शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने बँकांना दिले आहे. आजपर्यंत ६७ हजार ८०९ शेतकऱ्यांना ५५० कोटींचे पीककर्ज वाटप केले आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक शाखा असलेल्या राष्ट्रीयीकृत बँकांनी आजपर्यंत १८ टक्केच पीककर्ज वाटप केले आहे. तर जिल्हा बँकेने ६० टक्के तर ग्रामिण बँकने २९ टक्के पीककर्ज वाटप केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडून मिळाली.

जिल्हास्तरीय बँकर्स कमिटीच्या बैठकीत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आगामी खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यासाठी १८१२ कोटी, तर रब्बीसाठी ६३७ कोटी असे एकूण दोन हजार ४५० कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट २८ बँकांच्या वेगवेगळ्या शाखांना दिले आहे.

या बाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शेतकऱ्यांना वेळेत कर्ज देण्याची सूचना दिल्या आहेत. परंतु राष्ट्रीयीकृत बँकांकडून मात्र कर्ज वाटपाला अद्याप गती दिली नाही. जिल्ह्यात ३०.३९ टक्क्यांनुसार आजपर्यंत ६७ हजार ८०९ खातेदारांना ५५० कोटी ७५ लाखांचे कर्जवाटप केले आहे.

यात राष्ट्रीयीकृत बँकांकडून १८.०३ टक्क्यांनुसार २० हजार ७६८ शेतकऱ्यांना १९७ कोटी १७ लाखाचे पीककर्ज वाटप केले आहे.

तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ६०.९४ टक्क्यांनुसार ३२ हजार ६२३ शेतकऱ्यांना २४८ कोटी ८० लाख, तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेने २९.०५ टक्क्यांनुसार १४ हजार ४१८ शेतकऱ्यांना १२२ कोटी ७० लाखांचे कर्जवाटप केले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडून मिळाली.

राष्ट्रीयीकृत बँकांकडून टाळाटाळ

जिल्ह्यात पेरणीपूर्वी पीककर्ज मिळावे, यासाठी शेतकरी बँकांच्या दारी फिरत आहेत. परंतु अनेक राष्ट्रीयीकृत बँकांकडून नियमित कर्जदारांनाही पीककर्ज देण्यात टाळाटाळ करण्यात येत आहे.

वसुलीवर भर देऊन पीककर्ज वाटपाला मात्र विलंब लावण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना पेरणीसाठी खासगी सावकाराच्या दारात चकरा माराव्या लागत आहेत. तसेच अनेक शेतकऱ्यांनी मुदतीत कर्जाची परतफेड करूनही त्यांना राज्य सरकारच्या व्याज सवलत योजनेचा लाभ मिळत नसल्याची तक्रारी शेतकरी करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा तूर्तास टळला?

Agricultural Scheme: शेतकऱ्यांनो, ट्रॅक्टरसह कृषी अवजारांसाठी सरकारकडून ५० टक्क्यांपर्यंत अनुदान

Soybean Pest Control : सोयाबीन पिकावरील चक्रीभुंग्यांचे व्यवस्थापन

Mathura Labhan Cattle Breed : मराठवाड्यातील देखणा गोवंश ः मथुरा लभाण

Humani Control: १५ दिवसांत हुमणी करा गायब; हुमणी नियंत्रणाचे सोपे ३ मार्ग !

SCROLL FOR NEXT