Snail Agrowon
ॲग्रो विशेष

Snail: शंखी गोगलगाईचा पिकांवर प्रादुर्भाव

जवळगाव, गीता येथील शिवारात शंखी गोगलगाईंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. शेतकऱ्यांनी त्यांना वेचून नष्ट करण्यासह तज्ज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे नियंत्रणासाठीच्या उपाययोजनांवरील खर्च कमी करण्याचे प्रयत्न चालविले आहेत.

ॲग्रोवन वृत्तसेवा

अंबाजोगाई, जि. बीड : तालुक्यातील जवळगाव, गीता, सायगाव, कुंभेफळ, गिरवली, दस्तगीरवाडी मगरवाडी आदी शिवारात विविध पिकांवर शंखी गोगलगाईंचा (snail) प्रादुर्भाव वाढला आहे. सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर प्रादुर्भाव करणाऱ्या शंखी गोगलगाईंच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. काही भागांमध्ये पिकांचे कोंबच शंखी गोगलगायींनी फस्त केल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली आहे.

जवळगाव, गीता येथील शिवारात शंखी गोगलगाईंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. शेतकऱ्यांनी त्यांना वेचून नष्ट करण्यासह तज्ज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे नियंत्रणासाठीच्या उपाययोजनांवरील खर्च कमी करण्याचे प्रयत्न चालविले आहेत.

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार शेतकऱ्यांनी मेटाल्डिहाईडच्या गोळ्यांची भुकटी करून ती मुरमुऱ्यात मिसळून शेतात पसरवत शंखी गोगलगाईंवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या उपायामुळे जवळपास १९०० रुपये प्रति एकरी लागणारा खर्च ४५० ते ५०० रुपयांवर आला आहे. याचे परिणामही चांगले दिसत आहेत, असे जवळगाव येथील शेतकरी राजेसाहेब हारे यांनी सांगितले.

सामुहिक पद्धतीने नियंत्रण हाच उपाय...

मोठ्या प्रमाणात शंखी गोगलगाईंचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास शेतकऱ्यांनी सामूहिकरीत्या उपाययोजना केल्यास गोगलगाईंचे लवकर व प्रभावीपणे नियंत्रण होते, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT