Sugarcane Crushing Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crushing : नव्या ऊस गाळप हंगामाची सुरुवात संथ; २६३ कारखान्यांचे गाळप सुरु

Sugarcane Season : १५ नोव्हेंबर अखेर देशभरात २६३ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु झालेला आहेत. तर १६२ लाख टन ऊस गाळप झाले.

अनिल जाधव

Sugarcane Factory News : देशभरातील नव्या गाळप हंगामाची सुरुवात थोडी लवकर झालेली आहे. तरी प्रत्यक्ष ऊस गाळप आणि साखर उत्पादनाची गती गतवर्षीच्या तुलनेत संथ आहे. १५ नोव्हेंबर अखेर देशभरात २६३ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु झालेला आहेत. तर १६२  लाख टन ऊस गाळप झाले.

यंदा देशातील ऊस गाळप हंगामाची सुरुवात लवकर झाली. तर २६३ कारखान्यांचे गाळप सुरु झाले. गतवर्षी याच काळता ३१७ कारखाने सुरु झाले होते. ऊस गाळपाचा विचार करता आतापर्यंत १६२ लाख टनांचे गाळप झाले. गेल्यावर्षी याच काळात गाळप झालेल्या उसाच्या तुलनेत यंदा ८४ लाख टनानी गाळप कमी झाले. नव्या हंगामात आतापर्यंत १२ लाख ७५ हजार टन नवे साखर उत्पादन झाले. गत वर्षी याच काळातील साखर उत्पादन २० लाख टनांपर्यंत पोचले होते. आतापर्यंतचा सरासरी साखर उतारा देखील ०.३५ टक्क्यांनी कमी आहे.

``यंदा उत्तर प्रदेशातील साखर कारखाने पहिल्यांदाच ऑक्टोबर महिन्यात सुरु झाले. मात्र कर्नाटक आणि महाराष्ट्रातील साखर हंगाम १ नोव्हेंबर नंतर सुरु झाला. त्यातच पश्चिम महाराष्ट्रातील ऊस दर आंदोलन पेडले आहे. त्यामुळे नव्या हंगामाचे अनेक कारखान्यांमध्ये उद्घाटन झाले, पण कारखाने पूर्ण क्षमतेने सुरु नाहीत`` असे राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी सांगितले.

एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस कमी झाला. त्यामुळे यंदाच्या वर्षी ऊस गाळप व साखर उत्पादन गत वर्षीच्या तुलनेत कमी राहणार आहे. गेल्यावर्षी साखरेचे उत्पादन ३३९ लाख टन झाले होते. त्या व्यतिरिक्त ४३ लाख टन साखरेचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी झाला होता. मात्र यंदाच्या वर्षी ४० लाख टन साखर इथेनॉल निर्मीतीसाठी वळवल्यानंतर साखरेचे उत्पादन २९१ लाख टन इतकेच होण्याचा केंद्र शासनाचा अंदाज आहे.

केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या नव्या राष्ट्रीय सहकारी निर्यात संस्थेमार्फत नेपाळ आणि भूतान देशांना ५० हजार टन साखरेच्या निर्यातीचा निर्णय झाला आहे. ही निर्यात पूर्णपणे सहकारी साखर कारखान्यांच्या साखरेची होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Donald Trump Tarrif Decision: डोनाल्ड ट्रम्पचा भारताला जोरदार झटका; सर्वाधिक ५० टक्के आयात शुल्क लावणार

PM Kisan: किसान सन्मान नव्हे, अपमान योजना; पंजाबराव पाटील

Crop Insurance: चंद्रपुरात पीकविम्याला कमी प्रतिसाद

River Linking Project: सिंचन प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध

Anjangaon Surji APMC: अंजनगावसूर्जी बाजार समिती सभापती, प्रभारी सचिवावर गुन्हा

SCROLL FOR NEXT