Ujani Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Ujani Dam : उजनी धरणाच्या पाणी पातळीत किंचित वाढ

Ujani Dam Water Level : गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुणेसह परिसरात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्याने तिकडून उजनी धऱणाकडे पाणी सोडण्यात येत आहे. त्याचा परिणाम पाणीसाठा वाढवण्यात झाला आहे.

Team Agrowon

Solapur News : पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणामध्ये पाणी सोडले जात असल्याने धरणाच्या पाणी पातळीत किंचित वाढ झाली आहे. आठवडाभरापूर्वी १३ टक्केंवर असलेले उजनी धरण सध्या १७ टक्क्यांपर्यंत पोचले आहे.

यंदा जून, जुलै आणि ऑगस्ट असे तीनही महिने पावसाने पाठ फिरवली. धरणातील पाणी साठे वाढण्यास हाच काळ उपयुक्त असतो, पण या तीनही महिन्यात पुरेसा पाऊस झाला नाही. फक्त धरण उणे पातळीतून अधिक पातळीत आले. यंदा धरणातील पाणीसाठा अगदी गेल्या आठवड्यापर्यंत १२ ते १३ टक्क्यांवरच स्थिर होता. पण गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुणेसह परिसरात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्याने तिकडून उजनी धऱणाकडे पाणी सोडण्यात येत आहे. त्याचा परिणाम पाणीसाठा वाढवण्यात झाला आहे. सध्या पुण्याकडून उजनी धरणाकडे ४६२५ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे.

त्यामुळे हळूहळू पाणीसाठ्यात वाढ होत आहे. सध्या धरणातील एकूण पाणी पातळी ४९८.२७० मीटरवर आहे. तर धरणातील एकूण पाणीसाठा ७२.५९ टीएमसी आणि त्यापैकी उपयुक्त साठा ८.९३ टीएमसी एवढा आहे. तर पाण्याची टक्केवारी १६.६७ टक्के इतकी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Nuksan: अतिवृष्टीने मोठे नुकसान; दिवाळी सुनी..सुनी

MSEDCL TOD Meter: टीओडी मीटर बसवलेल्या पावणेदोन लाख वीजग्राहकांना ७५ लाखांची सवलत

Heavy Rain Damage: उभी पिके आडवी झाली, आडवी पिके चिखलाने माखली

Banana Crop Insurance: केळीचे जिओ टॅगींग न केल्यास विमा योजनेतील सहभाग रद्द

Rabi Sowing: मराठवाड्यात आजवर ७० हजार हेक्टरवरच पेरणी

SCROLL FOR NEXT