RBI Repo Rate Agrowon
ॲग्रो विशेष

RBI Repo rate: रिझर्व्ह बॅंकेकडून सलग सहाव्यांदा व्याजदरात वाढ; गृहकर्ज, वाहनकर्ज महागणार

देशातल्या वाढत्या महागाईला नियंत्रित करण्यासाठी सरकारने व्याजदर वाढीचा सपाटा लावला आहे. रिझर्व्ह बॅंकेने सलग सहाव्यांदा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे.

Team Agrowon

RBI Repo rate: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईन्टने वाढ केली आहे. त्यामुळे रेपो रेट ६.२५ टक्क्यांवरून आता ६.५० टक्क्यांवर गेला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी हा निर्णय जाहीर केला.

या निर्णयाचा फटका कर्जदारांना बसेल. कारण बँकांकडून घेतलेली कर्जे महागणार आहेत.

गृहकर्ज, वाहनकर्जाचे हप्ते वाढणार असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे.

देशातल्या वाढत्या महागाईला नियंत्रित करण्यासाठी सरकारने व्याजदर वाढीचा सपाटा लावला आहे. रिझर्व्ह बॅंकेने सलग सहाव्यांदा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे.

देशातील बँका रोजच्या व्यवहारासाठी आरबीआयकडून अल्प मुदतीचे कर्ज घेत असतात.

हे कर्ज देताना आरबीआय व्याज आकरते. हा जो व्याजदर आकाराला जातो त्यालाच 'रेपो रेट' असे म्हणतात.

रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शशिकांत दास म्हणाले, ``जागतिक पातळीवरील आर्थिक स्थिती ही काही महिन्यांपूर्वी होती तेवढी निराशाजनक नाही.

मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये चांगली वाढ दिसून आली आहे. महागाईचा दर कमी होत असला तरी अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांचा विचार करता महागाईचा दर हा चिंतेचा विषय आहे.

देशातील कोअर इन्फलेशन अजूनही जास्तच आहे.``

रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीच्या सहापैकी चार सदस्यांनी रेपो रेट वाढीच्या बाजूने कौल दिला.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Smart Packaging : उत्पादनाच्या गुणधर्मानुसार निवडा स्मार्ट पॅकेजिंग

Maharashtra Land Survey: सहा महिने वाट पाहावी लागणार नाही, आता जमीन मोजणी होणार ३० दिवसांत, महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय

Indian Agriculture: पंतप्रधान धन-धान्य कृषी आणि कडधान्ये आत्मनिर्भरता योजना शेतकऱ्यांचे भविष्य बदलतील- पंतप्रधान मोदी

Millet Farming : भरड धान्य आधारित संवर्धित शेती

Coconut Processing : नारळावर प्रक्रिया करून नफा मिळवा

SCROLL FOR NEXT