Pre-Monsoon Rains Agrowon
ॲग्रो विशेष

Pre Monsoon Rain : मॉन्सूनपूर्व पावसात सहा जणांचा बळी

Team Agrowon

Nashik News : मॉन्सूनपूर्व पावसाने जिल्ह्याला झोडपले असून, नैसर्गिक आपत्तीमुळे गेल्या तीन महिन्यांत सहा व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला तसेच १,५०० पेक्षा अधिक घरांचे नुकसान झाले. केवळ मनुष्य नव्हे, तर पशुधनाची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याने जिल्ह्याला मॉन्सूनपूर्व पावसाचा फटका बसल्याचे दिसून येते.

१० जूनअखेर आतापर्यंत १३ म्हशी, नऊ बैल, पाच शेळ्या व तब्बल ४७५ कुक्कट पक्ष्यांचा मृत्यू झाला. अंगावर वीज पडून किंवा भिंत कोसळल्याने सहा व्यक्तींचा मृत्यू झाला. यात बापू अशोक वैद्य (वय ३०, ता. निफाड) यांचा ४ जूनला अंगावर वीज पडून मृत्यू झाला. फुलाबाई रोहिदास चौधरी (३५, रा. पिंपरखेड, ता. दिंडोरी) या अनिता पवार यांच्या शेतात काम करीत असताना अंगावर भिंत पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. यादव नामदेव बोरसे (४८, रा. तोरंगण, ता. त्र्यंबकेश्‍वर) यांचा ९ जूनला वीज पडून मृत्यू झाला.

दोन दिवसांपासून चांदवड, देवळा, मालेगाव व नांदगाव या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि गारांचा मारा होत असल्याने अनेक घरांचे छत उडाले. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने पशु, पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. वासराचा मृत्यू झाला म्हणून त्याच्या जवळ गेलेल्या आकाश शरद देवरे याचाही उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी एका तरुणाचा जीव मॉन्सूनपूर्व पावसात गेला. देवीदास भाऊराव अहिरे (३४, रा. उमराणे, ता. देवळा) यांच्या अंगावर शेडची भिंत कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. रविवारी (ता. ९) दुपारी ही घटना घडली. विलास जंगलो गायकवाड (वय २८ रा. खादगाव, ता. नांदगाव) यांच्या अंगावर मंगळवारी (ता. ११) दुपारी वीज कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली; तर शेळ्या, मेंढ्या व जनावरेही मृत्युमुखी पडली आहेत.

नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना चार लाखांची आर्थिक मदत केली जाते. दिंडोरीतील एका व्यक्तीला ही मदत मिळाली. दोन प्रस्ताव मंजूर झाले असून, येत्या काही दिवसांत त्यांना मदत मिळेल. पशुधनाच्या प्रकारानुसार मदतीसाठी प्रस्तावांचे काम सुरू आहे.

तालुकानिहाय नुकसान

तालुका बाधित क्षेत्र (हेक्टर) बाधित घरे जीवितहानी

नाशिक ८.२३ २९ वासराचा मृत्यू

दिंडोरी २७ ५९ एका व्यक्तीचा मृत्यू

निफाड १.२० १८ एका व्यक्तीचा व म्हशीचा मृत्यू

इगतपुरी १० ०० ००

सिन्नर ० ६८ गायीचा मृत्यू

पेठ १४१३ २६४ गाय, दोन बैलांचा मृत्यू

देवळा २.९० १५ दोन व्यक्तींसह म्हैस, बैल, वासराचा मृत्यू

मालेगाव ० ० गाय, म्हैस, बैल, वासराचा मृत्यू

नांदगाव ०.६० ११ तीन गायी, बैल, पाच शेळ्यांचा मृत्यू

त्र्यंबकेश्‍वर २०६ ५४७ ०

चांदवड ० ४६ चार गायींचा मृत्यू

कळवण ० १० ०

येवला ० १७ गाय, बैलाचा मृत्यू

बागलाण ०.६० १० ४७५ कुक्कट पक्ष्यांचा मृत्यू

सुरगाणा ९३१.८६ ४६९ दोन बैलांचा मृत्यू

एकूण २६०१ १५६३ चार व्यक्तींसह गाय, १३ म्हशी, ९ बैल, ३ वासरे, ५ शेळ्या व ४७५ कुक्कट पक्ष्यांचा मृत्यू

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Palm Oil Prices : जागतिक बाजारात पामतेलाचे भाव वाढलेले; मलेशियाला होतोय फायदा

Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

Soybean Subsidy : सोयाबीन अनुदानासाठी आधार संमती पत्र भरून द्या; कृषी सहाय्यकांचं शेतकऱ्यांना आवाहन

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

Groundnut Harvesting : बोरपाडळे परिसरात भुईमूग काढणी सुरू

SCROLL FOR NEXT