Silver Rate
Silver Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Silver Market : चांदीची दरवाढ कायम; सोने दरात घट

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Jalgaon News : जळगाव ः राज्यात प्रसिद्ध असलेल्या येथील सराफा बाजारात मंगळवारी (ता. २१) चांदी दरात वाढ नोंदविण्यात आली. तर सोने दरात घट दिसून आली. सोने दराने विक्रम टप्पा गाठल्यानंतर एक तोळ्यामागे (१० ग्रॅम) ८०० रुपयांची घट झाल्याची माहिती मिळाली. चांदी दरात एक किलोमागे ३०० रुपयांनी वाढ होऊन दर ९२ हजार ८०० रुपयांवर पोहोचले आहेत.
सोने दरात प्रतितोळा ८०० रुपये घट होऊन दर आता ७४ हजार ३०० रुपयांवर आहेत.

अमेरिकेतील वित्तीय संकट, आखातातील युद्धजन्य स्थिती व अन्य कारणांनी मागील काही दिवसांत सोने दरात सतत वाढ नोंदविण्यात आली. वाढीचा हा कल मागील आठवड्यापर्यंत कायम होता. परंतु मंगळवारी सोने दरात घट झाल्याचे दिसून आले. चांदी दरातील वाढ मात्र सुरूच आहे. चांदी दराने ९० हजार रुपये प्रतिकिलोची दरपातळी ओलांडली. सोमवारी (ता. २०) चांदी दरात दोन हजार ५०० रुपयांची वाढ झाली होती. मंगळवारीदेखील चांदी दरात प्रतिकिलो ३०० रुपयांनी वाढ झाली. चांदी दर ९२ हजार ८०० रुपयांवर पोहोचले आहेत. चांदी दरात मागील सात दिवसांत सतत वाढ झाली.

सोने दर ७५ हजार १०० रुपये प्रतितोळा या दरपातळीपर्यंत पोहोचले होते. परंतु त्यात एकाच दिवसात प्रतितोळा ८०० रुपयांची घट झाल्याने दर ७४ हजार ३०० रुपये प्रतितोळा इतके खाली आले आहेत. दलाल मंडळीकडून चांदीत मोठी गुंतवणूक केली जात आहे. यामुळे चांदी दरात सतत वाढ होत आहे. सोने व चांदी दरातील ही चढउतार सुरूच राहील, असे सराफा बाजारातून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update : कोकणात धुवाधार पाऊस

Betel Leaf : खाऊच्या पानास चांगली मागणी; दरही टिकून

Weather Update : कोकण, घाटमाथ्यावर वाढणार पावसाचा जोर

Budget 2024 : अर्थसंकल्पापूर्वी अर्थमंत्री सितारामन यांनी घेतली बैठक; कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतुदीची सूचना ?

Jagtap Cooperative Sugar Factory : विधानसभा निवडणूक तोंडावर माजी आमदार जगताप आणि आमदार राजळे यांच्या साखर कारखानदारीला धक्का

SCROLL FOR NEXT