Animal Care Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Care : जनावरातील बुरशीमुळे होणाऱ्या विषबाधेची लक्षणे

Animal Poisoning : काही वेळा दुधाळ जनावराचे दूध अचानक कमी होत. जनावराची तब्येत खालावत जाते. प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे हसत -खेळत जनावर मलूल आणि सुस्त होतं. पण असं का होतय? याच नेमकं कारण मात्र लक्षात येत नाही.

Team Agrowon

Animal Feed : काही वेळा दुधाळ जनावराचे दूध अचानक कमी होत. जनावराची तब्येत खालावत जाते. प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे हसत -खेळत जनावर मलूल आणि सुस्त होतं. पण असं का होतय? याच नेमकं कारण मात्र लक्षात येत नाही. याच कारण असू शकत विषबाधा. जनावरांना ही विषबाधा बुरशीयुक्त खाद्य खाल्ल्यामुळे होते. विषबाधा जर गंभीर स्वरुपाची असेल तर जनावर दगावण्याचीही भिती असते.

बरेच पशुपालक जनावरांना पशुखाद्य म्हणून गहू, ज्वारी, तांदूळ, सोयाबीन, सरकी पेंड, शेंगदाणा पेंड देतात. पण वातावरणातील बदल किंवा व्यवस्थित साठवणूक न केल्यामुळे या खाद्याला अफ्लाटॉक्सीन सारखी बुरशी लागते. या बुरशीला अनुकूल वातावरण मिळाल्यास ही बुरशी खाद्यामध्ये जास्त काळापर्यंत राहते. असे बुरशीयुक्त खाद्या खाल्यामुळे जनावराला विषबाधा होते. ही विषबाधा बुरशीयुक्त खाद्य खाण्याच्या प्रमाणावर म्हणजेच तीव्र, मध्यम आणि कमी प्रमाणात दिसून येते.  

जनावराने अफ्लाटॉक्सीनयुक्त धान्य किंवा पशुखाद्य जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे तीव्र प्रकारची विषबाधा होते.  अनेक जनावरांना  या प्रकारची विषबाधा होते. काही जनावरे तर लगेच दगावतात. या विषबाधेच्या प्रकारात जनावरे अशक्त बनतात. चारा, पाणी खात नाहीत. सुस्त बनतात. काही जनावरांच्या तोंड, नाक आणि शेणातून रक्त पडते. काही जनावरांना जुलाब लागतात.

मध्यम प्रकारच्या विषबाधा 

जनावरांच्या आहारातून हळूहळू तीन महिन्यांपर्यंत अफ्लाटॉक्सीन गेल्यास मध्यम प्रकारची विषबाधा होते. मध्यम विषबाधेमध्ये  जनावरांना कावीळ होते, झटके येतात. अंगाला खाज सुटते. शरीरांतर्गत रक्तस्राव होऊन जनावराचा मृत्यू होतो.

कमी प्रकारची विषबाधा  

जनावराने जर पशुखाद्यातून सहा महिन्यांपर्यंत अफ्लाटॉक्सीन खाल्ल्यास कमी प्रमाणात विषबाधा होते. जनावरांमध्ये या प्रकारची विषबाधा जास्त प्रमाणात दिसून येते. ही विषबाधा लवकर लक्षात येत नाही. यामध्ये जनावरांची पचनशक्ती, क्रयशक्ती कमी होते. तब्येत कमी होत जाते. दुभत्या जनावरांची दूध देण्याची क्षमताही कमी होते. गाभण जनावरांना गर्भपात होतो. प्रतिकार शक्तीही खूप कमी होते.

खबरदारी

विषबाधेवर खात्रीशीर उपचार नसल्यामुळेही विषबाधा होऊच नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सगळ्यात महत्वाच म्हणजे आपण जनावरांना जे खाद्य किंवा चारा देतोय त्याची तपासणी करा.  काही पशुपालक कमी खर्चात पशुखाद्य, खुराक बनविण्यासाठी खराब धान्य खरेदी करतात. त्यामुळे हे धान्य बुरशीयुक्त नाही याची आधी खात्री करा. पिकाची कापणी, मळणी करतानाच बुरशीयुक्त चारा कापणी करताना वेगळा करून ठेवावा. तो चांगल्या चाऱ्या सोबत मिसळू नये. पशुखाद्याची साठवण ओलसर ठिकाणी करू नये. बुरशी लागलेला धान्याचा भरडा, मुरघास जनावरांना खाऊ घालू नये. 

विषबाधा टाळण्यासाठी उपाय

विषबाधा झालेल्या जनावरांना जास्त प्रोटीनयुक्त पशू खाद्य द्याव. जनावरांना पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्याने जीवनसत्त्व ई, सेलेनीयम द्यावे.  बाधित जनावरांना तातडीने पशुतज्ज्ञांकडून उपचार करावेत.

--------------------

 डॉ. बाबासाहेब घुमरे,  डॉ. विकास कारंडे  - क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात संततधार

Fertilizer Mismanagement : कृषी सेवा केंद्रातील खत साठ्यात तफावत

Heavy Rain Dharashiv : धाराशिव जिल्ह्यात पावसाचा हाहाकार

AI In Agriculture : सांगली जिल्हा बँक ‘एआय’साठी देणार अनुदान

Agriculture Marketing : शेतीमाल मार्केटिंग साठी ‘कृषी-पणन’ने एकत्र यावे

SCROLL FOR NEXT