Cotton Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Cultivation : सघन कापूस लागवडीमुळे उत्पादनात लक्षणीय वाढ

Cotton Production : सघन कापूस लागवडीमुळे उत्पादनात लक्षणीय वाढ झाल्याचे प्रतिपादन अंबाजोगाई येथील विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. वसंत सूर्यवंशी यांनी केले.

Team Agrowon

Beed News : सघन कापूस लागवडीमुळे उत्पादनात लक्षणीय वाढ झाल्याचे प्रतिपादन अंबाजोगाई येथील विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. वसंत सूर्यवंशी यांनी केले. दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र, अंबाजोगाई व केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांच्यावतीने कळमअंबा येथे कापूस प्रक्षेत्र दिनाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. सूर्यवंशी बोलत होते.

यावेळी मंचावर कळमअंबा गावाचे सरपंच शशिकांत इंगळे, केव्हीके अंबेजोगाईचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. वसंत देशमुख, कृषी महाविद्यालय अंबाजोगाईचे प्राध्यापक डॉ. राजेश महाजन, केव्हीके शास्त्रज्ञ पिकविद्या कृष्णा कर्डिले, शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप सांगळे, मंडळ कृषी अधिकारी आडस वाघमारे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. देशमुख यांनी केले. यावेळी डॉ. सूर्यवंशी यांनी रब्बी पिकातील अन्नद्रव्य नियोजन, हरभरा पिकातील मर व्यवस्थापन, गुलाबी बोंडअळी नियंत्रण करण्यासाठी उपाय योजना, कामगंध व चिकट सापळे वापर आणि मातीचे आरोग्य सांभाळण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर याबाबत माहिती दिली.

डॉ. सांगळे म्हणाले, की बोंड आळीचा प्रादुर्भाव ९ महिन्यांपर्यंत राहतो. तरी शेतकऱ्यांनी कापूस फरदड घेणे टाळावे. त्याचबरोबर रब्बी पिकातील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन केले.

मंडल कृषी अधिकारी श्री वाघमारे म्हणाले, की गुलाबी बोंड आळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गावातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापसाचे एकच वाण वापरावे. तसेच कृषी विभागाच्या ठिबक सिंचन, तुषार सिंचन, यंत्र, कांदाचाळ इत्यादी योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी या पोर्टलवर शेतकऱ्यांनी अर्ज कराव.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा कर्डिले यांनी केले तर शशिकांत इंगळे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कांताराम इंगळे, बालाजी बोबडे, सुरज पोकळे, रवींद्र अंबड, प्रदीप चव्हाण, शिवाजी किर्जत आणि प्रतीक आजने यांनी विशेष प्रयत्न केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update: राज्यातील बहुतांशी भागातील किमान तापमानात वाढ

Samruddha Panchayat Raj: शंभर टक्के करवसुली करणाऱ्या ग्रामपंचायतींचा होणार गौरव

Climate Change Impact: कमीअधिक थंडीसह पावसाच्याअंदाजानुसार करावयाचे व्यवस्थापन

National Award: एमएसईबी सोलार अॅग्रो पॉवर कंपनीला ‘स्कोच’कडून राष्ट्रीय पुरस्कार

EU India FTA: भारत- युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराराची तारीख ठरली, शेतीला वगळले

SCROLL FOR NEXT