Election Agrowon
ॲग्रो विशेष

Buldana Election Update : खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत मेहकरला शिवसेना, मलकापूरला भाजप

Buldana Election : बुलडाणा जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या मेहकर, मलकापूर खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीचे निकाल आले आहेत. मेहकरमध्ये खासदार प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वात सर्व जागांवर विजय मिळवण्यात शिंदे गट शिवसेनेला यश आले.

Team Agrowon

Buldana News : बुलडाणा जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या मेहकर, मलकापूर खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीचे निकाल आले आहेत. मेहकरमध्ये खासदार प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वात सर्व जागांवर विजय मिळवण्यात शिंदे गट शिवसेनेला यश आले.

तर मलकापूरमध्ये भाजपने एकतर्फी विजय संपादन केला. दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले.

मेहकरात शिवसेना सत्तेत

मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीने सात जागा जिंकल्याने सावध झालेल्या खासदार जाधव गटाने पूर्ण ताकद पणाला लावून खरेदी-विक्री संस्थेची निवडणूक लढवली. त्यात सर्वांच्या सर्व १७ जागा जिंकल्या.

येथे महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. ३० वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समिती आणि खरेदी विक्री संस्था खासदार प्रतापराव जाधव व आमदार संजय रायमूलकर गटाचे वर्चस्व आहे. शिवसेनेतून शिंदे गट वेगळा होऊन खासदार, आमदार तिकडे गेल्यानंतर या दोन्ही संस्थांच्या निवडणुका झाल्याने सर्वांचे लक्ष लागले होते.

खासदार जाधव व आमदार रायमूलकर हे दोघेही मेहकर येथील शिवसेना कार्यालयात तळ ठोकून बसले. वैयक्तिक मतदार संघातून प्रशांत शेषराव काळे, स्वप्नील भास्करराव घोडे, मदन चनखोरे, रविकुमार चुकेवार, विजय रामचंद्र देशमुख, विनोद पांडुरंग देशमुख, दत्तात्रय टेकाळे, शत्रुघ्न निकम, दीपक मगर, आत्माराम शेळके, मनोज सावजी तर अनुसूचित जाती मतदार संघातून जीवन वानखेडे , महिला राखीव मधून कमल धोंडगे, कमल वानखेडे आणि इतर मागासवर्गीय मधून कैलास बाजड हे विजयी झाले आहेत. सुरेशतात्या वाळूकर, राजेन्द्र वानखेडे हे दोघे आधीच बिनविरोध निवडून आले होते.

मलकापुरात खविसमध्ये भाजपची सत्ता

मलकापूरला भाजप शिवसेना युतीप्रणीत किसान प्रगती पॅनेलच्या उमेदवारांनी १५ पैकी १२ जागांवर विजय प्राप्त केला. महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनेलला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले.

किसान प्रगती पॅनेलचे वैयक्तिक मतदार संघातून श्रीकृष्ण खापोटे, विलास पाटील, प्रभाकर रायपुरे, दामोदर शर्मा, सहकारी संस्था मतदार संघातून सुजित भोसले, भास्कर घाईट, भास्कर क्षीरसागर, मधुकर पाटील, अनुसूचित जाती जमाती संघातून रामदास वाडसे, महिला मतदारसंघातून वैशाली सोनोने, इतर मागासवर्गीय संघातून रावजी कुयटे, विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातील संघातून शंकर पाटील असे एकूण १२, तर शेतकरी विकास पॅनेलचे वैयक्तिक मतदार संघातून मनोज सावजी, सहकारी संस्था मतदार संघातून उज्वल पाटील, अनुसूचित जाती जमाती संघातून कृष्णा रायपुरे विजयी झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahua Processing Business : गोडवा मोहफुलांच्या लाडवांचा

Beekeeping Business : तरुण उद्योजक मित्रांची अमृत मध निर्मिती

Land Circular: भोगवटादार वर्ग-२ जमिनींसाठी परिपत्रक

Soil and Water Engineering: मृदा, जलसंवर्धनामध्ये अभियांत्रिकी तंत्राचा वापर

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

SCROLL FOR NEXT