Jalgaon Apmc Election Agrowon
ॲग्रो विशेष

Jalgaon Market Committee Election Update : जळगाव बाजार समिती निवडणुकीत शिंदे गट, भाजपचा फॉर्म्यूला

जळगाव बाजार समितीत शिंदे व भाजप एकत्र लढण्यावर अंतिम शिक्कामोर्तब रविवारी (ता. १६) एका बैठकीत करण्यात आले.

Team Agrowon

Jalgaon Election Update : जळगाव बाजार समितीत शिंदे व भाजप एकत्र लढण्यावर अंतिम शिक्कामोर्तब रविवारी (ता. १६) एका बैठकीत करण्यात आले. भाजपला सहा आणि शिंदे गटास १२ जागा यानुसार मिळतील, असे निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बाजार समिती निवडणुकीत लक्ष्मी दर्शन घेऊन येण्याची चढाओढ या निवडणुकीशी संबंधितांमध्ये सुरू आहे. मतदारांना हवाई सफर, थंड हवेच्या ठिकाणी फेरफटक्याचे आमिष दाखवण्यात येत आहे.

सोसायट्या व ग्रामपंचायतींच्या मतदारांशी पॅनेलप्रमुख, उमेदवार संपर्क करीत आहेत. संबंधित तालुक्यातील सत्तेतील लोकप्रतिधी, वरिष्ठ नेत्यांशी गावातील प्रमुख मंडळीच्या भेटीगाठी घडविल्या जात आहेत.

त्यात सहलीचे नियोजन, थंड हवेच्या ठिकाणी फेरफटका आणि इतर आमिषे दाखविली जात आहेत. त्यादृष्टीने पॅनेलप्रमुख तयारीदेखील करीत आहेत. विजयासाठी आवश्यक हवा असलेला जादुई आकडा गाठण्याएवढीच रसद पुरविण्याची रणनीती पॅनेलप्रमुखांनी आखली आहे.

जळगावात विद्यामान सभापतींनी केले मोठे मन

जळगाव बाजार समितीमध्ये विद्यमान सभापती कैलास चौधरी यांनीदेखील शिंदे गटातर्फे अर्ज दाखल केला होता. सभापती चौधरी हे गुर्जर समाजातून आहे. गुर्जर समाजातील अनेक जण शिंदे गटातर्फे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.

यात स्पर्धा थांबावी आणि पॅनेलला पुढे सोपे जावे यासाठी चौधरी यांनी आपल्या समाजातील इतरांना संधी देण्याची तयारी दाखवून या निवडणुकीतून माघार घेतली.

उमेदवारांना निधीचे टार्गेट

पॅनेलमध्ये आलेल्या उमेदवारांना निधी किती आणावा लागेल, याचे टार्गेट देण्यात आले आहे. हा निधी अनेक भागांत गोळा करण्यात आला आहे.

काही बाजार समित्यांमध्ये सत्ताधारी नेते, लोकप्रतिनिधी कमाल निधी खर्च करून आपल्या समर्थकांना निवडून आणून पुढे विधानसभा व इतर निवडणुकांसाठी जमीन तयार करून घेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Livestock Mission : घोडे कुठे पेंड खाते?

Agristack Yojana : ‘महसूल’कडून एक लाख खातेदारांना अप्रूव्हल नाही

Papaya Farming : खानदेशात पावसानंतर पपई पीक जोमात

Bhama Askhed Dam : भामा आसखेड धरणात ५४.२५ टक्के पाणीसाठा

Illegal Excavation : बेकायदा मुरूम उपशावर कारवाई

SCROLL FOR NEXT