Maharashtra Shikhar Bank Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Cooperative Bank: शिखर बॅंकेचे ‘नेटवर्थ’ गेले पाच हजार कोटींच्या पुढे

Bank Turnover: राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेची उलाढाल आता ६२ हजार कोटींच्या आसपास पोहोचली आहे.

मनोज कापडे

Pune News: राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेची उलाढाल आता ६२ हजार कोटींच्या आसपास पोहोचली आहे. विशेष म्हणजे पाच हजार कोटी रुपयांच्या पुढे नेटवर्थ असलेली देशातील ही एकमेव सहकारी बॅंक बनली आहे.

बॅंकिंग जगतात नक्तमूल्यावरून (नेटवर्थ) बॅंकेची सुदृढता ठरवली जाते. ३१ मार्चअखेर शिखर बॅंकेचे नक्तमूल्य ५३०० कोटी रुपये झाले असून, निव्वळ नफा तब्बल ६५१ कोटी रुपयांपर्यंत झाला आहे. बॅंकेत आता २६ हजार ३५९ कोटींच्या ठेवी असून, कर्जवाटप ३५ हजार ५९७ कोटी रुपयांपर्यंत गेले आहे. बॅंकेचा स्वनिधी आता सात हजार ७३७ कोटी रुपयांपर्यंत गेला आहे.

तीन जिल्हा बॅंकांना मार्गदर्शन

कधीकाळी आर्थिक अडचणीत आलेल्या शिखर बॅंकेच्या प्रशासकपदाची धुरा बॅंकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यानंतर मात्र बॅंकेची झपाट्याने प्रगती होते आहे. शिखर बॅंक आता अडचणीतील नागपूर, नाशिक व बुलडाणा अशा तीन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांना मदत व मार्गदर्शन करते आहे.

शिखर बॅंकेने अलीकडेच बाजारात ५०० कोटी रुपयांचे कर्जरोखे आणले आहेत. तसेच, सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर स्थापन केले आहे. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळासमवेत बॅंकेने करार केल्यामुळे वखार पावतीवर शेतकऱ्यांना अल्पमुदतीचे कर्ज मिळण्याची सुविधा मिळाली आहे. यातून आतापर्यंत २०५ कोटी रुपये वाटप करण्यात आले आहे.

शिखर बॅंक कितीही मोठी झाली तरी तिने या राज्यातील सामान्य शेतकरी हाच केंद्रबिंदू ठेवला. त्यासाठी गावपातळीवरील सहकारी सोसायट्यांपासून ते जिल्हा मध्यवर्ती बॅंकांच्या हितासाठी बॅंकेने सतत पावले टाकली. बॅंकेच्या या नेत्रदीपक यशाचे खरे मानकरी शेतकरी आणि बॅंकेचे कर्मचारी आहेत.
विद्याधर अनास्कर, प्रशासक, महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बॅंक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात संततधार

Fertilizer Mismanagement : कृषी सेवा केंद्रातील खत साठ्यात तफावत

Heavy Rain Dharashiv : धाराशिव जिल्ह्यात पावसाचा हाहाकार

AI In Agriculture : सांगली जिल्हा बँक ‘एआय’साठी देणार अनुदान

Agriculture Marketing : शेतीमाल मार्केटिंग साठी ‘कृषी-पणन’ने एकत्र यावे

SCROLL FOR NEXT