Farmers' Association President Raghunathdada Patil Agrowon
ॲग्रो विशेष

Vidhan Sabha Election 2024 : शेतकरी संघटना उमेदवार उभे करणार : रघुनाथदादा पाटील

Maharashtra Assembly Constituency 2024 : राज्यभर उमेदवार जाहीर केले जाणार असल्याची घोषणा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केली.

Team Agrowon

Pune News : विधानसभेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार आहे. अनेक पक्ष राजकीय राहिले नसून त्या टोळ्या झाल्या आहेत. त्यांच्याकडून कोणतेही हित जोपासले जात नाही. फक्त घोषणा केल्या जात असल्या तरी त्यातून कर्जाचा डोंगर उभा राहत आहे. आम्ही जी भूमिका घेतो, ती भूमिका कोणीही घेत नाहीत.

सरकारकडून शेतकरी प्रश्‍न सोडवले जात नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्येकडे वळत आहेत. हे प्रश्‍न सोडविण्यासाठी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून, राज्यभर उमेदवार जाहीर केले जाणार असल्याची घोषणा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केली.

शेतकरी संघटनेच्या वतीने पुणे श्रमिक पत्रकार संघात मंगळवारी (ता. २२) पत्रकार परिषदेत श्री. पाटील बोलत होते. या वेळी शेतकरी संघटनेचे नगर जिल्हा अध्यक्ष अनिल औताडे, अॅड. अजित काळे, ग्राहक पंचायतीचे नेते शिवाजी खेडेकर, क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे अध्यक्ष शिवाजीराव नांदखिले, शंकर मोहिते, लक्ष्मण पाटील आदी उपस्थित होते.

आतापर्यंत २५ नावे जाहीर

शेतकरी संघटनेकडून २५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. परंतु येत्या दोन ते तीन दिवसांत १५० पर्यंत नावे जाहीर केली जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने लक्ष्मीकांत कौठकर (अकोट), मोहन मोनालीकर (पाथरी), अॅड. पांडुरंग रायते (इंदापूर), वसीम इनामदार (कराड उत्तर), अॅड. माणिक शिंदे (करवीर), डॉ. प्रगती चव्हाण (हातकणंगले), परशुराम माळी (पलूस कडेगाव), तात्या रोडे (तुळजापूर), चंद्रकांत भराटे (परांडा) ही नावे जाहीर केली आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Politics : जिल्हा बँक, सहकारी साखर कारखाने कोल्हापूर जिल्ह्याचे सत्ता केंद्र; ६ आमदार साखर कारखानदार

Maharashtra Cabinet : पश्चिम विदर्भात अकोला, बुलडाण्याला मंत्रिपदाची आस

Vijay Wadettiwar : महायुती जिंकली अभिनंदन! पण, नवे सरकार शेतकऱ्यांसाठी काय करते? यावर आमचे लक्ष असेल; वडेट्टीवार यांचा इशारा

Sweet Sorghum Ethanol : गोड ज्वारीच्या इथेनॉल खरेदी दराला केंद्र सरकारचा खोडा?

Onion Market : हंगाम बदल, कांदा चाळ अर्थकारणाला चालना मिळेना

SCROLL FOR NEXT