Vitthal-Rukmini Temple Agrowon
ॲग्रो विशेष

Vitthal-Rukmini Temple : विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकारीपदी शेळके

Vitthal-Rukmini Temple In Pandharpur : श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीचे पूर्णवेळ कार्यकारी अधिकारीपद गेल्या वीस महिन्यांपासून रिक्त होते.

Team Agrowon

Pandharpur News : श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीचे पूर्णवेळ कार्यकारी अधिकारीपद गेल्या वीस महिन्यांपासून रिक्त होते. आगामी आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या विधी व न्याय विभागाने नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथील उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके यांची श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकारीपदी प्रतिनियुक्ती केली आहे.

पंढरपूर येथील उपविभागीय अधिकाऱ्याकडेच पूर्वी श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीचा कार्यकारी अधिकारी म्हणून अतिरिक्त पदभार दिला जात असे. त्यानंतर गेल्या दहा वर्षांपासून शासनाने उपजिल्हाधिकारी दर्जाच्या स्वतंत्र अधिकाऱ्याची कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यास सुरवात केली.

विठ्ठल तथा सुनील जोशी हे उपजिल्हाधिकारी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी मंदिर समितीच्या अनेक योजनांना गती दिली होती.

सुमारे वीस महिन्यांपूर्वी त्यांचा दोन वर्षांचा कालावधी संपल्याने त्यांची चिंचवड येथे महसूल विभागात पूर्ववत बदली झाली. त्यानंतर मात्र मंदिर समितीला पूर्णवेळ कार्यकारी अधिकारी मिळालेला नव्हता.

उपजिल्हाधिकारी म्हणून मोक्याच्या ठिकाणी कार्यरत असलेले अधिकारी मंदिर समितीपुरते मर्यादित काम करण्यासाठी प्रतिनियुक्तीवर येण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे सुमारे वीस महिने पूर्ण वेळ कार्यकारी अधिकारी मिळाला नव्हता.

या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्याकडे शासनाने कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सोपवली होती. त्यांनीही मंदिर समितीच्या कामात शिस्त आणण्यास सुरवात केली होती.

दरम्यान, आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर शासनाने आता नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथील उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके यांची श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकारीपदी प्रतिनियुक्ती केली असून, त्याविषयीचे आदेश काढले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PMMSY Subsidy Scheme: मत्स्यपालनासाठी सरकार देतंय ६० टक्क्यांपर्यंत अनुदान; जाणून घ्या योजनेची 'A To Z' माहिती.

Tillage Implements: रब्बी हंगामाच्या मशागतीसाठी महत्त्वाचे यंत्र आणि अवजारे

Farmers Death : दोन महिन्यांत २ हजारहून अधिक शेतकरी आत्महत्या, पण राज्यकर्ते ढुंकून बघायला तयार नाहीत, शरद पवारांची जोरदार टीका

Agrowon Podcast: टोमॅटो दरात चढ उतार; कांदा दर दबावात, सोयाबीनचे दर कमीच, गवारला चांगला उठाव तर गव्हाचे भाव स्थिर

Agriculture Status: देशात पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा मिळणार! केंद्र सरकार सकारात्मक

SCROLL FOR NEXT