Agriculture Irrigation  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : शेळगाव बॅरेजमुळे यंदा ३८ गावांना जलसंजीवनी

Jalgaon Water Supply : शेळगाव बॅरेज प्रकल्पातून आवर्तन सोडण्याच्या निर्णयामुळे परिसरातील २५ गावांना सलग दोन महिने पिण्याचे पाणी उपलब्ध राहणार आहे.

Team Agrowon

Jalgaon News : जिल्ह्यातील शेळगाव बॅरेज प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्याने यंदा प्रथमच त्यातून आवर्तन सोडले जाणार आहे. सध्या ६७ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने जळगाव, धरणगाव, यावल व चोपडा या चार तालुक्यांतील जवळपास ३८ गावांना या आवर्तनाने मोठा दिलासा मिळणार आहे.

गावकऱ्यांना दोन महिन्यांचा दिलासा !

शेळगाव बॅरेज प्रकल्पातून आवर्तन सोडण्याच्या निर्णयामुळे परिसरातील २५ गावांना सलग दोन महिने पिण्याचे पाणी उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पाणीटंचाईच्या संकटातून मोठा दिलासा मिळणार आहे. प्रशासनाने यासाठी तातडीने कार्यवाही सुरू केली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता यशवंत भदाणे व कार्यकारी अभियंता कामेश पाटील हे नियोजन करत आहेत.

प्रकल्पातील साठा असा

सध्या ६७.५० द.ल.घ.मी. (६१.१५%) पाणीसाठा असून, आवर्तन सोडल्यानंतर प्रकल्पात २५.०० द.ल.घ.मी. (२१.००%) पाणी शिल्लक राहणार आहे. ६० ते ७० दिवसांपर्यंत पाणीपुरवठा होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले

या गावांना होणार लाभ

जळगाव तालुका : आसोदा, भादली, ममुराबाद, शेळगाव, तुरखेडे, आमोदे, भोकर, कानसवाडे, आवार, घार्डी, भोलाणे, विदगाव, धानोरे, सुजदे, डीकसाई, करंज, लिधुर, किनोद.

यावल तालुका : टाकरखेडे, भालशिव, शिरागड.

चोपडा तालुका : पुनगाव, मितावली, पिंप्री, वडगाव, वटार सुटकार, खेडी, भोकरी, कोळंबे, सनफुले, कठोर, कुरवेल, निमगव्हाण, तावसे, खाचणे.

धरणगाव तालुका : धरणगाव शहर, नांदेड, पिंप्री, पथराड.

‘सुप्रमा’नंतर कामांना गती

शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पातील पुलांचे काम, भूसंपादन, बुडीत क्षेत्रातील रस्ते, कडगाव-जोगलखेडा उंच पूल, शेळगाव-बामनोद उंच पूल, तसेच यावल उपसा सिंचन योजना यांसारख्या अनुषंगिक कामांसाठी तृतीय सुप्रमा मंजुरी मिळणे आवश्यक आहे.

तृतीय सुप्रमा प्रस्ताव तांत्रिक सल्लागार समिती, नाशिक यांना ६ ऑगस्ट २०२४ला तांत्रिक तपासणीसाठी सादर केला असून, मंजुरी मिळाल्यास या कामांना गती मिळणार आहे. बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत यावल उपसा सिंचन योजनेस शासनाने १२ जुलै २०२४ रोजी तत्त्वतः मान्यता दिली असून, तृतीय सुप्रमा प्रस्तावात योजनेचा समावेश केला असल्याची माहितीही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईचे वितरण सुरू

Agrowon Diwali Article : आदिवासींची निसर्गपूरक शेती

Agrowon Diwali Article: शाश्‍वत शेती पद्धतीशिवाय पर्याय नाही

Soybean MSP : हमीदर ५३२८ रुपयांचा खरेदी केली केवळ ५०० रुपये क्‍विंटलने

Agrowon Diwali Article: स्त्रियांची शाश्‍वत शेती

SCROLL FOR NEXT