Sharad Pawar Sugar Agrowon
ॲग्रो विशेष

Sharad Pawar News : शरद पवारांचा अध्यक्षपदाचा राजीनामा निवड समितीने फेटळला

शुक्रवारी (ता.५) निवड समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हा निर्णय एकमताने घेतल्याचे पटेल यांनी सांगितले.

Team Agrowon

Sharad Pawar: राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अध्यक्षपदाचा शरद पवार यांनी दिलेला राजीनामा निवड समितीने एकमताने फेटळला, अशी घोषणा निवड समितीच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केली. शुक्रवारी (ता.५) निवड समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हा निर्णय एकमताने घेतल्याचे पटेल यांनी सांगितले. तसेच पवारांना याबाबत भेटून राजीनामा परत घेण्याची विनंती समिती करणार आहे. अशी माहिती पटेल यांनी दिली.

"राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु कमिटी राजीनामा फेटाळत आहे. त्यामुळे पवार साहेबांनी अध्यक्ष पदावर राहावं, असा सर्वानुमते ठराव पास झाला आहे." असा ठराव पास केल्याचे पटेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

त्यामुळे अजूनही राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अध्यक्षपदावरून सुरू असलेली 'टर्न अँड ट्विस्ट' संपलेली नाहीत.

पवार साहेबांनी या पदावरून बाजूला होऊ नये, अशी कार्यकर्त्यांची आणि जनमाणसाची इच्छा आहे. पवार साहेबांनी आम्हाला विश्वासात घेतलं नाही. त्यावर जी कमिटी स्थापन केली होती, त्या कमिटीची बैठक पार पडली. सर्वानुमते एक ठराव पारित केला आहे. हाच ठराव घेऊन पवार साहेबांना भेटणार आहोत, असं पटेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

या निर्णयामुळे तीन दिवसांपासून राजीनामा मागे घेण्याची मागणी करत विविध प्रकारे आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रदेश कार्यालयासमोर जल्लोष साजरा केला.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धक्कातंत्राचा वापर करत राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा मंगळवारी (ता. २) केली.

आता कोणतीही निवडणूक लढवणार नाही, तसेच राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार आहे, अशी घोषणा पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण सभागृह मुंबई येथील कार्यक्रमात केली.

शरद पवार यांचे राजकीय आत्मचरित्र असलेल्या 'लोक माझे सांगाती'च्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात पवार बोलत होते. पवारांनी निवृत्तीची घोषणा केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT