Ladki Bahin Yojana  Agrowon
ॲग्रो विशेष

MGNREGA Scheme And Anganwadi Servants Remuneration : अंगणवाडी सेविका आणि मजूर लाडके नाहीत का..?, शरद पवार गटाने सरकारला डिवचले

NCP- SP On Mahayuti Government : पुढच्या दोन एक महिन्यात राज्यात विभानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्याआधी राज्यातील महायुती सरकारकडून सरकारी योजनांसह 'लाडकी बहिण' योजनेच्या प्रसार आणि प्रचारासाठी मोठा खर्च केला जात आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्य सरकारकडून सरकारी योजनांसह लाडकी बहीण योजनांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी मोठे कार्यक्रम आखले जात आहेत. यावरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सत्ताधारी महायुती सरकारवर टीका केली आहे. तसेच अंगणवाडी सेविका आणि मजूर लाडके नाहीत का..?, असा सवाल केला आहे.

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकींचे वारे वाहू लागले आहेत. सत्ताधारी महायुती सरकारमधील पक्षांसह विरोधक देखील उमेदवार आणि मतदारसंघाच्या चाचपणीत व्यस्त आहेत. तर सत्ताधारी 'लाडकी बहिण' योजनेसह इतर योजना लोकांपर्यंत नेण्याची धडपड करताना दिसत आहे. तर 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'सह महिलांसाठी असणाऱ्या इतर योजनांचा प्रसार आणि प्रचारासाठी जिल्हानिहाय मार्गदर्शक मेळाव्यांचे आयोजन केले जाणार आहे.

निवडणुकीच्या तोंडावर सरकारने विविध योजनांचा वर्षाव केलाय. सरकारकडून केल्या जाणाऱ्या अशा कार्यक्रमावरून शरद पवार गटाने सरकारवर टीका केली आहे. रोजगार हमी योजनेतील मजुरांची मजुरी सरकारने थकवल्याचा आरोप शरद पवार गटाने केला आहे. तसेच 'लाडकी बहिण' योजना यशस्वी करण्यासाठी कष्ट घेणाऱ्या अंगणवाडी सेविकांचे मानधन देखील दिले गेले नाही, असा निशाना देखील शरद पवार यांच्या गटाने सरकारवर साधला आहे.

तर 'लाडकी बहिण' योजना यशस्वी करण्यासाठी सरकार अशा पद्धतीने मनरेगा मधील मजूर आणि अंगणवाडी सेविकांवर दुजाभाव करत आहे. सरकारचा दुजाभाव आता समोर आला आहे. तर सध्याच्या सरकारसाठी फक्त लाडकी खुर्ची आहे, सामान्य जनता नाही, अशी खोचक टीका केली आहे.

रोहयोतील मजुरीची रक्कम थकीत

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणारे राज्यातील लाखो मजूरांना मागील दोन महिन्यांपासून मजुरी मिळालेली नाही. केंद्र सरकारने या योजनेचे ३१८ कोटी रुपये थकवले आहेत. राज्यात सुमारे ३५ हजारहून अधिक कामांची रक्कम केंद्र सरकारकडे थकीत आहे. त्यामुळे राज्यातील मनरेगा योजनेच्या मजूरांना मजुरीची वाट पाहावी लागत आहे. गेल्या एप्रिलमध्ये रोहयोची मजुरी प्रतिदिन २७३ वरून २९७ रुपयांपर्यंत वाढविली गेली.

याआधी देखील शरद पवार गटाने सरकारवर 'आनंदाचा शिधा' वाटपावरून टीका केली होती. गणेशोत्सव संपत आला तरी जनसामान्य लाभार्थ्यांपर्यंत 'आनंदाचा शिधा' पोहोचलाच नाही. पण दुसरीकडे मात्र महायुती सरकारच्या भ्रष्ट नीतीने आनंदाचा शिधा' काळ्याबाजारात विक्रीसाठी दाखल झाल्याचे शरद पवार गटाने म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

September Rain: सप्टेंबरमध्ये विदर्भात जोरदार तर मराठवाड्यात सरासरी पावसाचा अंदाज; मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज

Shet raste GR : शेतकऱ्यांच्या शेत, शिव व पाणंद रस्त्यांना मिळणार विशिष्ट क्रमांक; वाद टळणार? 

Indian Politics: स्थैर्याची कसोटी पाहणारा ‘सप्टेंबर’

Maharashtra Crop Loss: महाराष्ट्रात पावसामुळे १० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान; नांदेडला अतिवृष्टीग्रस्त जिल्हा म्हणून घोषित करण्याची मागणी

Climate Change Impact : उत्तरेकडील राज्यांत ढगफुटी, भूस्खलनात वाढ

SCROLL FOR NEXT