Sharad Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Sharad Pawar Retirement News: शरद पवारांची निवडणूक न लढवण्याची घोषणा; राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अध्यक्ष पदावरूनही निवृत्ती

Sharad Pawar will Retire as NCP President : शरद पवार यांचे राजकीय आत्मवृत्त असलेल्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी पवारांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केली.

Team Agrowon

Rashtravadi Congress News : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धक्कातंत्राचा वापर करत राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा मंगळवारी (ता. २) केली.

आता कोणतीही निवडणूक लढवणार नाही, तसेच राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार आहे, अशी घोषणा पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण सभागृह मुंबई येथील कार्यक्रमात केली.

शरद पवार यांचे राजकीय आत्मचरित्र असलेल्या 'लोक माझे सांगाती'च्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात पवार बोलत होते. पवारांनी निवृत्तीची घोषणा केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर सभागृहातील राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय मागे घेण्यासाठी पवारांना साकडे घातले. त्यांच्या प्रतिक्रिया तीव्र होत्या. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर धाव घेत पवारांना घेराव घातला.

शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताच सभागृत कार्यकर्ते नाराज झाले होते. यावेळी आम्ही राजकारणात सक्रिय राहणार नाही, असे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदासाठी एक समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती अध्यक्षाबाबत निर्णय घेईल, असे देखील शरद पवार यांनी भाषणात सांगितले आहे.

आता पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कोण असणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

यानंतर अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील आदि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांनी पवारांशी व्यासपीठावरच चर्चा केली.

पवारांशी चर्चा केल्यानंतर अजित पवार म्हणाले, "पवार साहेबांनी अध्यक्षपदासाठी समिती नेमण्याचं सुचवले आहे. त्या समितीत पक्षाची माणसं असतील. समितीचा जो निर्णय होईल त्यानुसार अध्यक्ष निवड करण्यात यावी, अशी शरद पवारसाहेब यांची इच्छा आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता शांत राहावं." अशी विनंती अजित पवार यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hingoli Crop Loan : हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे ३५.१६ टक्के उद्दिष्ट साध्य

Rabi Season : पाच लाख ५४ हजार हेक्टरवर रब्बीत पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन

District Co-operative Bank : जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली

Amravati Rain Deficit : अमरावती जिल्ह्यात २२ दिवसांपासून पावसाचा खंड

Crop Damage Panchnama: पिकांवर रोटाव्हेटर फिरवू नका, नुकसानीच्या पंचनाम्यासाठी पुरावे राहतील, सहकारमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT