Sharad Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Sharad Pawar : 'आता आणखी किती निवडणुका लढवायच्या?'; शरद पवार यांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत

Sharad Pawar On Political Retirement : बारामतीत यंदा हाय होल्टेड लढत होत असून शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांनी अजित पवार यांच्याविरोधात विधानसभेसाठी उतरवलं आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून बारामतीच्या लढतीकडे अख्या देशाचे लक्ष लागले आहे. बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार विरूद्ध युगेंद्र पवार अशी लढत होणार आहे. तरीही येथे प्रत्यक्षात लढत अजित पवार विरूद्ध शरद पवार अशीच आहे. यामुळे बारामतीकडे राज्याचे विशेष लक्ष आहे. यादरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंगळवारी (ता.५) राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत. ते बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्या प्रचारसभेमध्ये बोलत होते. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीत पक्ष कोणाचा आहे? हे शरद पवार यांनी दाखवून दिले होते. आता विधानसभा निवडणुकीत देखील शरद पवार जोमाने कामाला लागले आहेत. यावेळी शरद पवार यांनी, आपण गेल्या ५५ वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सक्रिय आहे.

यादरम्यान अनेकांचा जन्म देखील झाला नव्हता. तर काही लोक हयात होते. राज्याच्या कानाकोपऱ्यात काम करायला सुरुवात केली. १९६७ साली लोकांनी मतदारांनी मला निवडून दिले. मी विधानसभेत गेलो, राज्यमंत्री झालो, मंत्री झालो, मुख्यमंत्री झालो, संरक्षण खातेही हाताळलं. कृषिमंत्री झालो आणि आता राज्यसभेवर आहे. एकदा लोकसभेत मतदारांच्या मतांवर निवडून गेलो. यानंतरच ठरवलं की पुन्हा लोकसभा नाही, असे म्हटले आहे.

पक्ष वाढवण्यासाठी राज्यसभा निवडली आणि राज्यातले राजकारण २५ ते ३० वर्षांसाठी अजित पवारांकडे दिले. पण आता पुन्हा वेगळी तयारी करावी लागणार आहे. वेगळं नेतृत्व तयार केले पाहिजे. लोकांमध्ये जाऊन प्रश्न सोडवण्यासाठी, लक्ष घालण्यासाठी आपण युगेंद्र पवारांच्या हाती बारामतीची सूत्रं सोपवत असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

तसेच यावेळी शरद पवार यांनी, अजून राज्यसभेचे दीड वर्षं बाकी असून आता राज्यसभेत जायचं की नाही याचा विचार करावा लागेल, असे म्हटले आहे. लोकसभा असो किंवा इतर कोणतीही निवडणूक लढवणार नाही. आता आणखी किती निवडणुका लढवायच्या? आत्तापर्यंत १४ निवडणुका लढवल्या आणि लोकांनी प्रेमही खूप दिलं. पण आता कुठेतरी थांबलं पाहिजे, असं वाटतंय. नवी पिढी आणली पाहिजे. त्यांच्याकडे सुत्रे दिली पाहिजीते असे वाटत असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यांमुळे शरद पवार राजकीय निवृत्ती घेतील अशी चर्चा सुरू झाली आहे.

एकीकडे राजकारणातून निवृत्तीचे संकेत देत असताना दुसरीकडे आपण समाजकारण सोडलेलं नाही. लोकांची सेवा, लोकांचं काम करतच राहणार आहे. दलित, भटके विमुक्त, उपेक्षित या वर्गासाठी जे काही करता येईल, ते करायचं असल्याचेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Disease : कांदा पिकावर करपा, पिळरोगाचा प्रादुर्भाव

Strawberry Cultivation : महाबळेश्वर तालुक्यात स्ट्रॉबेरी लागवड अंतिम टप्प्यात

Gokul Dudh Sangh : कोल्हापूर जिल्हा दूध संघाकडून ‘गोकुळ श्री’ स्पर्धा, पहिलं बक्षिस ३५ हजार

Paddy Harvesting : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३५ हजार हेक्टरवरील भातपीक कापणी पूर्ण

Water Storage : शिराळा तालुक्यातील ४७ पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरले

SCROLL FOR NEXT