Sharad Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Sharad Pawar : ईडीकडून जाणून बुजून कारवाई; शरद पवार यांची रोहित पवार यांच्यावरील कारवाईवरून टीका

Baramati Agro Raid : आमदार रोहित पवार यांच्या ‘बारामती अ‍ॅग्रो’ कंपनीशी संबंधित कारखान्यावर ईडीने कारवाई केली. तसेच कारखान्याची मालमत्ता ताब्यात घेण्यात आली आहे. यावरून ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा’चे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा’चे आमदार रोहित पवार यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई केली आहे. रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीशी संबंधित कन्नड सहकारी साखर कारखान्याची १६१ एकर जमीन ईडीने जप्त केली आहे. यावरून खासदार शरद पवार यांनी टीका केली आहे. शरद पवार यांनी, 'देशातील तपास यंत्रणांचा लोकसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून गैर वापर सुरू आहे', असे म्हटले आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत सोमवारी (ता. ११) केली आहे.

रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीशी संबंधित कन्नड सहकारी साखर कारखान्यावर ईडीने केलेल्या कारवाईवरून शरद पवार यांनी भाजपवर टीका केली आहे. त्यांनी, देशातील तपास यंत्रणांचा लोकसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून गैर केला जात आहे. याचे सध्याचे मोठे उदाहरण म्हणजे कर्नाटकातील असून ईडीने शिवकुमार यांच्यावर कारवाई केली होती. मात्र त्यांच्यावर आरोप सिद्ध झाले नाहीत आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांची निर्दोश मुक्तता केली असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

तर लोकसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून सध्या देशातील तपास यंत्रणांचा वापर भाजप करत आहे. राज्यात देखील अशाच कारवाया केल्या जात आहेत. यातूनच रोहित पवार यांच्यासारख्या नेत्यावर कारवाई केली जात आहे. रोहित पवार यांच्यावर आरोप असा आहे की सरकारने कारखाना विकायला काढला. टेंडर काढले आणि तो कारखाना रोहित पवार यांनी घेतला.

पण राज्यातील अनेक कारखाने हे विकले गेले. त्यातील काही कारखाने हे २५ कोटीच्या आत विकले गेले होते.या कारखान्यांवर कोणतीच नोटीस अथवा कारवाई ईडी किंवा सरकारने केली नाही. पण रोहित पवार यांनी घेतलेल्या कारखान्यावर कारवाई केली जात आहे. ईडीकडून ही कारवाई जाणून बुजून केली जात असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

तसेच सध्याच्या घडीला भाजपकडून तपास यंत्रणांचा वापर सुरू असून विरोधकांना निवडणूका लढवू नका अशी सरळ सरळ धमकी दिली जात आहे. तर २०१४ मध्ये भाजप सत्तेवर आल्यापासून ईडीच्या कारवाया वाढल्या आहेत. मात्र काँग्रेसच्या काळात ईडीचा वापर राजकीय हेतून केला गेला नाही असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Second List: कर्जमाफीची दुसरी यादी प्रसिद्ध, ३ लाख ५५ हजार ६१४ पात्र शेतकऱ्यांचा समावेश

Agriculture Graduates Issues: कृषी पदवीधर, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कृषिमंत्र्यांची भेट

Silk Farming: रेशीम शेतीतून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाची संधी : डॉ. महेंद्र ढवळे

Shetkari Samruddhi Kisan Rail: ‘शेतकरी समृद्धी’ किसान रेल नावालाच!

Sugarcane Price Protest: ऊस दर जाहीर न करताच जॅगरी प्रकल्प सुरू, 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली

SCROLL FOR NEXT