Amit Shah Vs Sharad Pawar : शिर्डी येथे झालेल्या भाजपच्या एकदिवसीय अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवार (ता.१४) पत्रकार परिषद घेत अमित शाह यांच्या टिकेला उत्तर दिले आहे. मला टीका जिव्हारी लागली नाही, पण संबंधित व्यक्तीची नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही. शाहांचे वक्तव्य मला हास्यास्पद वाटते. अशी टीका शरद पवारांनी अमित शाह यांच्यावर केली.
शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले की, "देशात अनेकांनी गृहमंत्री म्हणून चांगल काम केलं. या लोकांना कधी तडीपार केलेलं मी ऐकलं नाही. देशाच्या गृहमंत्र्यांनी काही महाराष्ट्रात आल्यावर माझ्यावर काहीतरी विधान केलं. मला वाटत त्यांनी थोडी माहिती घेऊन बोलायला हवं", असे पवार म्हणाले.
पवार पुढे म्हणाले "यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण हे अनेक वर्ष देशाचे गृहमंत्री होते. त्यांचे काम कौतुकास्पद होते. गृहमंत्री अमित शाह यांनी माझ्यावर टीका केली. पण त्यांनी थोडी माहिती घेऊन टीका केली तर बरं होईल. मी १९५८ पासून राजकारणात आहे. मी १९७८ साली राज्याचा मुख्यमंत्री होतो, त्यावेळी शाह राजकारणात कुठे होते" अशी शरद पवार यांनी टीका केली.
"मी मुख्यमंत्री असताना माझ्या मंत्रीमंडळात जनसंघाचे नेते उत्तमराव पाटील यांच्यासारखे कर्तृत्वान लोक होते. जनसंघाची पार्श्वभूमी असणाऱ्या अनेक लोकांनी त्यावेळी माझ्यासोबत काम केल्याचे पवार म्हणाले. तसेच वसंतराव भागवत आणि प्रमोद महाजन यांनी देखील त्या काळात मदत केली" असे शरद पवार म्हणाले.
"मागच्या ३० ते ४० वर्षात देखील विविध राजकीय पक्ष होते, त्यांच्यात एक प्रकारचा सुसंवाद होता. अटलबिहारी वाजपेयी हे कर्तृत्वान व्यक्ती होती. भुजमधे भूकंप झाला त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांनी एक बैठक बोलावली होती. मी विरोधी पक्षात असताना देखील अटलबिहारी वाजपेयी यांनी मला एका समितीवर नेमलं होतं. सगळी जबाबदारी माझ्याकडे दिली होती" असे पवार म्हणाले.
"१९७८ मध्ये शरद पवार यांनी बंडखोरी केली होती. त्यांनी त्यावेळी विश्वासघात करण्याचे जे राजकारण केले होते, त्यांना धडा शिकवण्याचे काम महाराष्ट्रातील जनतेने केले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनाही २०१९ मध्ये आमच्यासोबत द्रोह केला. त्यांनी विचारधारा सोडली. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले. त्या उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्याचे काम तुम्ही केले. विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवली. १९७८ ते २०२४ पर्यंत महाराष्ट्र जेव्हा जेव्हा अस्थिर करण्याचा प्रयत्न केला. त्या, त्या वेळी स्थिर सरकार देण्याचे काम तुम्ही केले. हिंदुत्व आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या राजकारणास विरोध करणाऱ्यांना तुम्ही धडा शिकवला. विधानसभा निवडणुकी खरी शिवसेना खऱ्या राष्ट्रवादीला तुम्ही विजय केले. घराणेशाही राजकारण करणाऱ्यांना नाकारले". असे अमित शाह म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.