Shaktipeeth Highway agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway : कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्गाविरोधात एल्गार; सांगलीतील शेतकऱ्याचा राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे सवाल

Shaktipeeth Highway Kolhapur : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला कागल तालुक्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करत तहसील कार्यालयावर मोर्चा काढत तिथेच ठिय्या मांडला.

sandeep Shirguppe

Shaktipeeth Highway Oppose Farmers : राज्याचे आरोग्य शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल तालुक्यात सर्वाधिक गावांमधून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. यामध्ये ऊस शेती मोठ्या प्रमाणात असल्याने येथील शेतकऱ्यांनी कागल तहसील कार्यालयावर बुधवारी (ता.०२) भव्य मोर्चा काढत शक्तिपीठ महामार्गाला तीव्र विरोध केला. तर सांगली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने शक्तिपीठ महामार्गात कोल्हापूर, सांगलीतील मुख्य देवस्थाने येणारच नाहीत, तर हा महामार्ग काय कामाचा? असाल सवाल राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे उपस्थित केला आहे. यामुळे शक्तिपीठ विरोधात महिनाभर शांत झालेले वातावरण पुन्हा तापू लागले आहे.

कागल तालुक्यातून तीव्र विरोध

नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला कागल तालुक्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करत तहसील कार्यालयावर मोर्चा काढत तिथेच ठिय्या मांडला. यानंतर तहसीलदार अमरदीप वाकडे यांना निवेदन देऊन शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, अशी आग्रही महामार्ग बाधितांनी मागणी केली.

यावेळी माजी आमदार घाटगे म्हणाले की, "महामार्ग घोषणा झाल्यापासून १२ जिल्ह्यांतून महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. हा महामार्ग शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा असून पर्यावरणाची हानी होणार आहे. इरिगेशन स्कीम, कूपनलिका, विहिरी, छोटे उद्योग यांचे नुकसान करणारा आहे. शासन हा महामार्ग रेटण्यासाठी प्रयत्न करत शक्तिपीठ महामार्ग कशासाठी याचे कारण आम्हाला अद्याप समजलं नाही.

सांगलीतही शक्तिपीठची ठिणगी

कोल्हापूरनंतर सांगली जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गाविरोधात जोरदार विरोध होत आहे. गुढी पाडव्यादिवशी शक्तिपीठच्या विरोधात काळी गुढी उभारून सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. तर एका शेतकऱ्यांने थेट शक्तीपीठ विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल यांना पत्र लिहत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील मुख्य मंदीरेच जोडली जात नाहीत तर हा महामार्ग काय कामाचा असा सवाल केला आहे. मिरज तालुक्यातील कवलापूर गावच्या संभाजी दिनकर सावंत यांची जमीन शक्तिपीठ महामार्गात जाणार आहे. यावर शक्तिपीठ विरोधात त्यांनी जनहीत याचीका दाखल केली आहे.

पत्रात दिलेल्या माहितीनुसार, हा रस्ता पवनार येथून चालू न होता वर्ध्याच्या पलीकडे असलेल्या झडगाव या गावाजवळून सुरू होतो. शक्तिपीठ माहूरगडला स्ता जोडलेलाच नाही. तुळजापूरला हा रस्ता कुठेही जोडला गेला नाही. श्री क्षेत्र औदुंबर हे ठिकाण नियोजित शक्तिपीठ महामार्गापासून कोसो दूर राहणार आहे. कोल्हापूरचे अंबाबाई मंदिरही या महामार्गाला जोडले गेले नाही. मग हा महामार्ग कोणत्या मंदिरांसाठी आहे असा सवाल सावंत यांनी केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT