Water Shortage  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : शिरूर तालुक्यातील विविध गावांत तीव्र पाणीटंचाई

Water Shortage : तालुक्यातील कोंढापुरी येथील शासकीय तलावातील पाण्यावर कोंढापुरी, रांजणगाव गणपती, पिंपरी दुमाला, खंडाळे, वरुडे, निमगाव म्हाळुंगी आदी गावांतील शेतकरी व ग्रामपंचायतीच्या पाणी योजना अवलंबून आहेत.

Team Agrowon

Pune News : तालुक्यातील कोंढापुरी येथील शासकीय तलावातील पाण्यावर कोंढापुरी, रांजणगाव गणपती, पिंपरी दुमाला, खंडाळे, वरुडे, निमगाव म्हाळुंगी आदी गावांतील शेतकरी व ग्रामपंचायतीच्या पाणी योजना अवलंबून आहेत. येथील तलाव कोरडा ठणठणीत पडल्याने सर्व पाणी योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे शासकीय तलावात चासकमानचे पाणी सोडण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील गायकवाड, सरपंच अपेक्षा गायकवाड, उपसरपंच सुनील गायकवाड, कोंढापुरी ग्रामविकास फाउंडेशनचे अध्यक्ष धनंजय गायकवाड, उपाध्यक्ष उद्योजक विनय गायकवाड व ग्रामस्थांनी यांनी या संदर्भात आमदार अशोक पवार यांची भेट घेतली. यावर येथील तलावात प्राधान्याने पाणी सोडले जाईल, असे आश्वासन आमदार पवार यांनी दिले असल्याची माहिती स्वप्नील गायकवाड यांनी दिली आहे.

कोंढापुरी येथील कुंभारखणी तलावातही चासकमानचे पाणी चारीद्वारे सोडावे,०अशी आग्रही मागणी माजी सरपंच अशोक गायकवाड, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य दिनेश गायकवाड व ग्रामस्थांनी केली आहे.

खंडाळे (ता. शिरूर) येथेही पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून कोंढापुरी तलावात पाणी सोडण्याची मागणी खरेदी- विक्री संघाचे माजी अध्यक्ष राजेंद्र नरवडे व ग्रामस्थांनी केली आहे. करंजावणे (ता.शिरूर) येथेही तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, येथील तलावात चासकमानचे पाणी सोडावे अशी मागणी सरपंच मंगल दौंडकर व उपसरपंच यांनी केली आहे.

तसेच शिरूर तालुक्यातील कासारी गाव हे चासकमानच्या पाण्यावर अवलंबून असून, येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथील शासकीय तलावात चासकमानचे पाणी त्वरित सोडावे, अशी मागणी सरपंच सुनीता भुजबळ, खरेदी-विक्री संघाचे माजी संचालक संभाजी भुजबळ, सोसायटीचे माजी अध्यक्ष रावसाहेब काळकुटे व राजेंद्र काकडे, माजी सरपंच गुलाबराव सातपुते, माजी उपसरपंच सुखदेव भुजबळ, प्रगतिशील शेतकरी हनुमंत भुजबळ, माजी उपसरपंच गोपाळ भुजबळ व ग्रामस्थांनी केली आहे.

तसेच तळेगाव ढमढेरे येथील २४ वा मैल व तांबूळ ओढा येथील शासकीय तलावात चासकमानचे पाणी सोडण्याची आग्रही मागणी ग्रामपंचायत सदस्य स्वाती लांडे, माजी ग्रामपंचायत सदस्य मोहन भुजबळ, अण्णा भुजबळ, सचिन लांडे, ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष बाळासाहेब लांडे व ग्रामस्थांनी केली आहे.

पाटबंधारे विभागाला सूचना ः आमदार पवार

‘‘सध्या चासकमानचे पाणी शिरूर तालुक्यासाठी सोडले असून, हे पाणी ‘हेड टू टेल’पर्यंत सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मागणी केलेल्या सर्व भागांतील शेतकरी व नागरिकांना चासकमानचे पाणी सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत. सर्व भागात चालू आवर्तनातील पाणी मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. चालू वर्षात शिरूर तालुक्यात पाऊस अत्यल्प झाल्याने सर्वत्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे,’’ अशी माहिती आमदार ॲड.अशोक पवार यांनी सांगितली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election 2024 Update : भाजप पहिल्या स्थानावर; तर कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, पहिले कल काय सांगतात?

Agro Vision Krishi Exhibition : विकसनशील भाग म्हणून विदर्भ कृषी क्षेत्रात नावारूपास येणार

Maharashtra Election 2024 : सत्तास्थापनेसाठी दोन्हींकडून तयारी; मतदानात ०.९४ टक्क्यांची वाढ

Orange Growers Compensation : संत्रा बागायतदारांना भरपाईसाठी ‘तारीख पे तारीख’

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

SCROLL FOR NEXT