Crop Damege Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damege : गारपिटीमुळे १७ हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान

Hailstorm : नांदेडमधील ६४ गावांत २२ हजार शेतकऱ्यांचे नुकसान

Team Agrowon

Nanded News : नांदेड : जिल्ह्यात रविवारी (ता. ११) दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. तसेच अनेक गावांत गारपीट झाली. यामुळे भोकर, धर्माबाद, उमरी, हिमायतनगर या चार तालुक्यांतील जिरायती, बागायती व फळपिके अशा एकूण १७ हजार २२९ हेक्टरचे नुकसान झाले आहे. ६४ गावांतील २१ हजार ८७५ शेतकऱ्यांना नुकसानीचा फटका बसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला दिली आहे.

जिल्ह्यात रविवारी दुपारनंतर भोकर, धर्माबाद, उमरी, हिमायतनगर, मुदखेड या तालुक्यांत वादळी वारे वाहू लागले. यातच अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर गारांचा मारा सुरू झाला. त्यामुळे काढणीला आलेल्या गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, उन्हाळी ज्वारी, चारापिके यांसह बागायती व फळपिकांना फटका बसला. हातातोंडाशी आलेले पीक अस्मानी संकटामुळे मातीत मिसळल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.

प्रशासनाच्या पाहणीनुसार, जिल्ह्यात एकूण १७ हजार २२९ हेक्टरचे नुकसान झाले आहे. नुकसानीची ‘एनडीआरएफ’अंतर्गत भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

नांदेड जिल्ह्यातील नुकसान (हेक्टरमध्ये)
तालुका...गावे...बाधित शेतकरी...जिरायत क्षेत्र...बागायत क्षेत्र...फळपिके क्षेत्र...एकूण क्षेत्र
भोकर...तीन...७७१...५०६...५०...०००...५५६
धर्माबाद...चार...१७२३...१३४५...३०...२०...१३९५
उमरी...३५...१०१६८...६५७१...१२६२...२२७...८०६०
हिमायतनगर...२२...११२१३...६९९०...२१७...११...७२१८
एकूण...६४...२१८७५...१५४१२...१५५९...२५८...१७२२९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Forecast: उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता

Beed Railway : मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी अहिल्यानगर-बीड रेल्वे धावणार

Rain Crop Damage : पावणेतीन लाख हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त

Makan-Kirana Scheme : ग्रामीण महिलांना घरकुलाबरोबर किराणा दुकानासाठी थेट मदत

Rover Machine Shortage : रोवर युनिटची संख्या वाढेना

SCROLL FOR NEXT