Unseasonal Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Jharkhand Rain Update : झारखंडमध्ये अवकाळीचा कहर; वीज पडून पाच तर झाड कोसळून दोघांचा मृत्यू 

Unseasonal Rain in Jharkhand : राज्याच्या विविध भागात मंगळवारी (ता. ०७) सायंकाळी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊसाने हजेरी लावली. यावेळी राज्यात वीज पडून रांचीत झाड कोसळून मृत्यू झाला. 

Aslam Abdul Shanedivan

Pune News : गेल्या पंधरवड्यापासून जम्मू आणि काश्मिर उत्तराखंडसह इतर ठिकाणच्या नेसर्गिक आपत्तींमुळे नागरीक हैराण झाले आहेत. यादरम्यान झारखंडमध्ये अवकाळीचा कहर पाहायला मिळत आहे. येथे राज्याच्या विविध भागात मंगळवारी (ता. ०७) सायंकाळी विजांच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसामुळे सात जणांना जीव गमवावा लागला आहे. कोडरमाच्या चतरा आणि चंदवाडा येथे प्रत्येकी एक, धनबादमधील एक आणि पलामूच्या मोहम्मदगंजमध्ये १२ वर्षांचा मुलगा आणि चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू वीज पडून झाला. तर राजधानी रांचीच्या तातिसिल्वे भागात झाड कोसळून दोघांचा मृत्यू झाला. 

रांचीसह राज्याच्या विविध भागात मंगळवारी (ता. ०७) सायंकाळी जोरदार वादळ, वीजांचा कडकडाट आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात सात जणांना आपला जीव गमवावा लागला असून वाहनांचे नुकसान झाले आहे. तर रांचीच्या तातीसिल्वे झाड कोसळल्याने कार आणि दुचाक्यांमध्ये धडक झाली. यात दुचाकीवरून जाणाऱ्या सोनू कुमार साहू याचा जागीच तर विद्यार्थिनी ज्योती भारती हिचा रिम्स येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अचानक वातावरणात बदल

हवामान केंद्राच्या म्हणण्यानुसार, उत्तर-पूर्व मध्य प्रदेशाजवळ चक्रीवादळाची निर्मीती झाली आहे. ईशान्य ओडिशातून राजस्थानच्या दिशेने मान्सून लाईन तयार झाली आहे. यामुळे येथे अचानक वातावरणात बदल झाल्याने जोरदार वादळ, वीजांचा कडकडाट आणि अवकाळी पाऊस झाला. 

झारखंडच्या अनेक भागात गेल्या सोमवारपासून अधूनमधून जोरदार वारे वाहत होते. तर कोडरमा, बोकारो, हजारीबाग, चाईबासा, चंदनकियारीसह अनेक भागात जोरदार पाऊस झाला आहे. राजधानीच्या काही भागातही पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी गारपीट झाल्याचेही वृत्त असून कोल्हाणला जोरदार वाऱ्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. येथे अनेक विद्युत खांब व झाडे उन्मळून पडली आहेत. 

वादळ आणि गारपिटीचा अंदाज

दरम्यान हवामान विभागाने राज्याच्या अनेक ठिकाणी ९ मे पर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवताना जोरदार वाऱ्यांबाबत पिवळा अलर्ट जारी केला आहे.  या काळात वादळ आणि गारपिटीचीही शक्यता असून कमाल तापमानात चार ते सहा अंश सेल्सिअसने घसरण होऊ शकते असे हवामान केंद्राचे प्रभारी संचालक अभिषेक आनंद यांनी सांगितले आहे. 

यावेळी हवामान तज्ज्ञ आनंद म्हणाले, बुधवार आणि गुरुवारी राज्यात अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. मेघगर्जना आणि विजाही पडू शकतात. ९ आणि १० मे रोजी काही ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहू शकतात. ११ मे रोजीही काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Whatsapp Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?

SCROLL FOR NEXT