Water Shortage  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : सात लघू प्रकल्प जोत्याखाली

Water Shortage : ७ लघू तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. परिणामी या तलावातून यंदा रब्बी, उन्हाळी हंगामात सिंचनासाठी पाणी आवर्तने मिळणार नाहीत.

Team Agrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील चारठाणा (ता. जिंतूर) लघू प्रकल्प कोरडा आहे. देवगाव, जोगवाडा, बेलखेडा, चिंचोली, दहेगाव (सर्व ता. जिंतूर), नखावाडी (ता. सोनपेठ), कोद्री (ता. गंगाखेड) या ७ लघू तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. परिणामी या तलावातून यंदा रब्बी, उन्हाळी हंगामात सिंचनासाठी पाणी आवर्तने मिळणार नाहीत. या तलावांवर अवलंबून असलेल्या गावांना येत्या काळात तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

परभणी जिल्ह्यातील २२ लघू तलावांचे लाभक्षेत्र ८ हजार ९४६ हेक्टर आहे. यंदा पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस न झाल्यामुळे अनेक तलावांमध्ये अत्यंत अल्प पाणीसाठा जमा झाला होता. गेल्या महिनाभरात पाऊस झाला नाही. तापमानात वाढ झाली. बाष्पीभवनामुळे पाणीसाठ्यात मोठी घट होऊन उपयुक्त पाणीसाठा संपुष्टात येऊन ७ तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला. एक तलाव कोरडा पडला आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लघू प्रकल्पामध्ये गुरुवारी (ता. २६) सरासरी १४ टक्के पाणीसाठा होता. त्यात पेडगाव (ता. परभणी) येथील तलावात १३ टक्के, आंबेगाव (ता. मानवत) येथील तलावात ९ टक्के, वडाळी (ता. जिंतूर) येथील तलावात ३ टक्के, आडगाव (ता. जिंतूर) येथील तलावात ३ टक्के, केहाळ (ता. जिंतूर) येथील तलावात २ टक्के, भोसी (ता. जिंतूर) येथील तलावात १६ टक्के, कवड (ता.जिंतूर) येथील तलावात २ टक्का, मांडवी (ता. जिंतूर) येथील तलावात २ टक्के, पाडाळी(ता. जिंतूर) येथील तलावात ७ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. त्यामुळे भविष्यात स्थिती बिकट राहील.

मध्यम प्रकल्पांत २३ टक्के पाणीसाठा

परभणी जिल्ह्यातील निवळी (ता. जिंतूर) येथील करपरा मध्यम प्रकल्पाच्या जलाशयात यंदा गुरुवार (ता.२६) पर्यंत ८. ६२६ दलघमी (३५ टक्के) तर गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पांमध्ये ३. ५३७ दलघमी (१३ टक्के) पाणीसाठा आहे. दोन्ही प्रकल्पांत सरासरी २३ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी (२०२२) हे दोनही मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले होते.

परंतु गतवर्षीच्या तुलनेत यंदा खूप कमी पाणीसाठा आहे. यंदा या दोनही प्रकल्पांमध्ये अपुरा पाणीसाठा आहे. त्यामुळे रब्बी व उन्हाळी हंगामात सिंचनासाठी पाणी आवर्तने मिळणार नाहीत. त्यामुळे पेरणीक्षेत्रात घट येणार आहे. या प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी कमी पडू शकते. त्यामुळे येत्या पावसाळ्यापर्यंत या प्रकल्पांवर अवंलबून असलेल्या अनेक गावांतील पाणीटंचाईची समस्या अधिक तीव्र होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT