Sesame Market  Agrowon
ॲग्रो विशेष

Sesame Market : विदर्भातील बाजारात तीळ १२ हजार रुपयांवर

Sesame Rate : विदर्भातील काही बाजार समित्यांमध्ये तिळाच्या दरात पुन्हा तेजी अनुभवली जात आहे. कारंजा बाजार समितीत १२ हजार रुपये क्‍विंटलने व्यवहार होत असतानाच १०० क्‍विंटलच्या आत तिळाची आवक असलेल्या अमरावती बाजार समितीत ११००० ते ११७५० असा दर मिळत आहे.

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Sesame Production : नागपूर ः विदर्भातील काही बाजार समित्यांमध्ये तिळाच्या दरात पुन्हा तेजी अनुभवली जात आहे. कारंजा बाजार समितीत १२ हजार रुपये क्‍विंटलने व्यवहार होत असतानाच १०० क्‍विंटलच्या आत तिळाची आवक असलेल्या अमरावती बाजार समितीत ११००० ते ११७५० असा दर मिळत आहे. यापुढील काळात दरात सुधारणांची अपेक्षा व्यक्‍त केली जात आहे.

कारंजा लाड (वाशीम) बाजार समितीत १५० क्‍विंटल तिळाची आवक होत आहे. या बाजार समितीत सध्या तिळाला कमीत कमी ११७०५ तर जास्तीत जास्त १२२५५ रुपयांचा दर मिळत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. १२०४० रुपये सरासरी याप्रमाणे तिळाचे व्यवहार या ठिकाणी होत आहे. तिळाखालील सर्वाधीक क्षेत्र यवतमाळ जिल्ह्यात आहे.

या भागातील शेतकऱ्यांनी कीड, रोगाचा वाढता प्रादुर्भाव व त्याच्या परिणामी घटती उत्पादकता या कारणामुळे भुईमुगाऐवजी तिळाला पसंती दिली. त्यामुळे यवतमाळ बाजार समितीत तिळाची आवकही वाढती राहते. सद्या या बाजार समितीत १०५०० ते ११६०० रुपयांचा दर मिळत आहे. या बाजारात दरात मोठ्या प्रमाणावर चढउतार होत असल्याचे सांगण्यात आले. १२ जून रोजी १०२०० ते ११७०० रुपयांचा दर होता. त्यानंतरच्या काळात दरात सुधारणा अनुभवण्यात आली.

भुईमूग ६३०० रुपयांवर
अमरावती बाजार समितीत भुईमुगाचे व्यवहार ५३०० ते ६२०० रुपयांनी होत आहेत. या ठिकाणी ५८५ क्‍विंटलची आवक झाली. कारंजा लाड बाजार समिती भुईमूग आवकेसाठी देखील ओळखली जाते. या ठिकाणी ८०० क्‍विंटल इतकी भुईमुगाची आवक नोंदविण्यात आली. भुईमुगाचे व्यवहार ४५५० ते ६३०० रुपयांनी होत आहेत. यवतमाळ बाजार समितीचा विचार करता या ठिकाणी भुईमुगाला ५३९५ ते ६२३० रुपयांचा दर मिळाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

SCROLL FOR NEXT