Farmer protest Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : शेतकऱ्यांविरुद्ध दाखल गंभीर गुन्हे परत घ्या

Farmer Movement of Office : शेतीच्या सिंचनासाठी कृषिपंपाद्वारे पाणी उपसा करणाऱ्या १६ शेतकऱ्यांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (ता. २६) सावखेड भोई येथील शेतकऱ्यांनी मृद्‍ व जलसंधारण विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

Team Agrowon

Buldhana News : शेतीच्या सिंचनासाठी कृषिपंपाद्वारे पाणी उपसा करणाऱ्या १६ शेतकऱ्यांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (ता. २६) सावखेड भोई येथील शेतकऱ्यांनी मृद्‍ व जलसंधारण विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसने स्वयंस्फूर्तीने पाठिंबा दिला. दरम्यान, संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांना सादर करण्यात येईल व शेतकऱ्यांवरील गुन्ह्यांसंदर्भात लेखी जबाब नोंदविला जाईल, या अटींवर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

तालुक्यातील सावखेड भोई येथील शेतकऱ्यांनी अनावधानाने कृषी पंपचोर समजून जलसंधारण विभागाच्या कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची घटना २२ डिसेंबर रोजी घडली होती. या प्रकरणात कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रामेश्‍वर मुळेसह दुष्काळग्रस्त १६ शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. सावखेडभोई येथील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी मृद्‍ व जलसंधारण विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांवरील गुन्हे हे अन्यायकारक असून परत घ्यावे. तसेच कृषिपंप सुरू ठेवण्यासाठी पैशांची मागणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करून निलंबन करावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. आंदोलनाची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले.

दरम्यान, उपविभागीय अभियंता व्ही. पी. लाकडे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करीत कारवाईचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस विनायक भानुसे, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रमोद घोंगे, तालुकाध्यक्ष राजेश इंगळे, सचिव जहीर पठाण, विजय खांडेभराड, ओमप्रकाश भुतेकर,

रवी इंगळे, रावसाहेब गाढवे, अजमत खान, सुरेश कोल्हे यांच्यासह सावखेडभोईचे माजी सरपंच अशोक जाधव, जनार्दन ढोणे, सुखदेव शेळके, अमोल टेकाळे, सर्जेराव माने, महेंद्र जाधव, रामराव वाघमारे, काशिनाथ जाधव, नारायण जाधव, सुखदेव गांधिले, संतोष मगर सहभागी होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी अनुदान वितरणास मान्यता; तीन शासन निर्णय प्रसिद्ध

Sugarcane Payment : उसाचे पैसे थकविल्याने शेतकऱ्यांचा संताप

Marathwada Rainfall : मराठवाड्यात अपेक्षेच्या तुलनेत पावसाची तूटच

Agriculture Scheme: बोअरिंगसाठी शेतकऱ्यांना मिळणार ४० हजारांचे अनुदान

Tree Geo Tagging : सातारा जिल्ह्यात ५० लाख झाडांचे होणार जिओ टॅगिंग

SCROLL FOR NEXT